घरठाणे...म्हणून शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत, राज ठाकरेंचा घणाघात

…म्हणून शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत, राज ठाकरेंचा घणाघात

Subscribe

मला सांगा कुठल्या संघटना काढल्यात राष्ट्रवादीने संभाजी बी ग्रेड, सी ग्रेड अशा अनेक संघटना त्यांनी काढल्या आहेत. या 1999 नंतरच कशा काय आल्या. योगायोग नाही तर यांनीच काढल्या. पवार साहेबांची पुण्याला मुलाखत घेतली होती, तेव्हा एक प्रश्न विचारला होता. तो काढून बघा, त्यांचं वय बघून मी फार खोलात गेलो नाही, असंही राज ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

ठाणेः राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून शरद पवार ज्या ज्या वेळी भाषण करतात, त्यावेळी ते म्हणतात हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. मान्यच आहे, त्या अगोदर महाराष्ट्र सर्वप्रथम जर कोणाचा असेल तर तो आमच्या छत्रपती शिवरायांचा आहे. पवार साहेब कधीही छत्रपतींचं नाव घेताना कुठल्याही सभेत दिसणार नाहीत. कारण छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर मुसलमान मतं गेली तर काय करायचं, म्हणून आमच्या शिवछत्रपतींचं ते कधीही नाव घेत नाहीत, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर घणाघात केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेत शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय.

शाहू-फुले-आंबेडकरांनंतर छत्रपतींचं जर राजकारण करायचं असेल, जातीचं राजकारण करायचं असेल, महाराष्ट्रातल्या बांधवांची भगिनींची माथी भडकवायची असतील. तर मग कोणी पुस्तकं लिहिलीत, ब्राह्मणांनी लिहिलीत. अजून कोणीतरी काहीतरी लिहिलंय ते उकरून काढायचं. अफझलखान इथे आला होता, तेव्हा महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. पण त्यात हिंदू-मुसलमान असं काही नव्हतं. मग पवारसाहेब तो कशासाठी आला होता, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केलाय.

- Advertisement -

तो केसरी टूर्ससाठी विना वर्ल्डचं तिकीट घेऊन आला होता काय. महाराष्ट्र दर्शन करायचं म्हणून आला होता काय. छत्रपतींनी ज्यावेळी स्वराज्याची शपथ घेतली, त्यावेळी हातात ध्वज कोणता घेतला, तर भगवा घेतला. भागवत धर्माचा घेतला. महाराष्ट्राचा घेतला. आमच्या संतांचा घेतला, आमच्या मंदिरांवरचा घेतला. ही लढाई तेव्हा कधी तुम्हाला दिसली नाही काय? हिरव्या झेंड्याच्या विरोधातील हा भगवा झेंडा ही लढाई तुम्हाला दिसली नाही. स्वतः शरद पवार हे नास्तिक आहेत. त्यामुळे ते धर्माकडे बघताना नास्तिकतेतून बघतात. एखादा मंदिरात हात जोडताना दुर्मीळ फोटो तुम्हाला मिळेल नाही तर तोही मिळणार नाही. ते स्वतः नास्तिकच आहेत. धर्म बिर्म काही मानत नाहीत. देवबिव मानत नाही, असंही राज ठाकरे म्हणालेत.

जातीयवाद हा राष्ट्रवादीमुळेच आला. महाराष्ट्रात जात होतीच, प्रत्येक जातीला प्रत्येक जातीतल्या माणसाला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता. 1999 ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. तो जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला. आमच्या मुलांची माथी भडकावली गेली. इतिहास चुकीचा सांगितला गेला म्हणे, पवार साहेब सांगतात, इतिहास चुकीचा सांगितला गेला. मला सांगा कुठल्या संघटना काढल्यात राष्ट्रवादीने संभाजी बी ग्रेड, सी ग्रेड अशा अनेक संघटना त्यांनी काढल्या आहेत. या 1999 नंतरच कशा काय आल्या. योगायोग नाही तर यांनीच काढल्या. पवार साहेबांची पुण्याला मुलाखत घेतली होती, तेव्हा एक प्रश्न विचारला होता. तो काढून बघा, त्यांचं वय बघून मी फार खोलात गेलो नाही, असंही राज ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -

राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून शरद पवार ज्या ज्या वेळी भाषण करतात, त्यावेळी ते म्हणतात हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. मान्यच आहे, त्या अगोदर महाराष्ट्र सर्वप्रथम जर कोणाचा असेल तर तो आमच्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. पवार साहेब कधीही छत्रपतींचं नाव घेताना कुठल्याही सभेत दिसणार नाहीत. कारण छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर मुसलमान मतं गेली तर काय करायचं, म्हणून आमच्या शिवछत्रपतींचं ते कधीही नाव घेत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीनं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. त्यातून मग बाबासाहेब पुरंदरे त्यांचे सॉफ्ट टार्गेट असतात. बाबासाहेब पुरंदरेंनी चुकीचा इतिहास सांगितला असं म्हणता कोणत्या पानावरती कोणत्या ओळीत सांगितला ते तर सांगा ना, असंही राज ठाकरे म्हणालेत.

यांचे इतिहासकार कोण तर म्हणे कोकाटे आहेत. कोण कोकाटे, बरं महाराजांवरती आजपर्यंत रणजित देसाईंनी लिहून ठेवलं. संभाजी राजांवरती शिवाजी सावंतांनी लिहून ठेवलं. बाबासाहेबांनी लिहिलं, मेहेंदळेंनी लिहिलं. अनेक लोकांनी लिहिलं आहे. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं शिवाजी महाराज महाराष्ट्रासमोर आणले. घराघरात जर शिवाजी महाराज कोणामुळे पोहोचले असतील, तर ते बाबासाहेब पुरंदरेंमुळे पोहोचले. हे नाकारून चालणारच नाही. ते कोणीही मान्य करेल. त्यांची व्याख्याने असू देत, पुस्तक असू देत नाही तर काहीही असू देत. पण आम्हाला इतिहास नाही बघायचाय. आम्हाला ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसानं लिहिलं आहे ते बघायचं आहे. आम्ही आमच्या शिवछत्रपतींचा इतिहास सांगणार नाही आहोत, आम्ही मराठेशाहीचा इतिहास सांगणार नाही आहोत, आम्ही त्या फोड करणार, तर फोड काय करणार तर बघा पेशव्यांनी चालवलेलं, पेशव्यांनी केलेली गोष्ट काय पवार साहेब काय चाललंय. पवार साहेब तुमच्यासारख्या माणसानं हा समाजातील जातीपातीचा भेद गाडला पाहिजे. तुम्ही याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तुमच्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी या गोष्टी करतात, असंही त्यांनी सांगितलंय.


हेही वाचाः माझ्या ताफ्याला अडवणार हे कळलं, पण पवारांच्या घरावरील हल्ल्याचं समजलं नाही : राज ठाकरे

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -