घरCORONA UPDATEदिलासादायक : राज्यातील हे ९ जिल्हे कोरोना मुक्त!

दिलासादायक : राज्यातील हे ९ जिल्हे कोरोना मुक्त!

Subscribe

राज्यातील ९ जिल्हे असेही आहेत, जिथे आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.

राज्यातील २७ जिल्हे कोरोनाच्या महामारीने त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन दिवसात या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे; मात्र, राज्यातील ९ जिल्हे असेही आहेत, जिथे आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. यामध्ये बीड, भंडारा, धुळे, गडचिरोली, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. ही बातमी दिलासादायक असली, तरी आणखी काही दिवस सतर्कता बाळगण्याची गरज आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे राज्यभरात संचारबंदी लागली. तसेच राज्याच्या सीमा ही सील केल्या आहेत. राज्याअंतर्गत होणाऱ्या स्थळांतरणाला आळा घालणे शक्य झाले. त्यामुळे याचा सकारात्मक परिणाम ही दिसून येत आहे. आणि दुसरीकडे राज्यातील कोरोना प्रभावित जिल्ह्यामध्ये बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. याशिवाय मृत्यूदर ही वाढत आहे. परंतु राज्यामधील संचारबंदी आणि सीमाबंदीमुळे ९ जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. तरी रोज इतर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी घाबरून न जाता कोरोनाशी दोन हात करत घरातच थांबणे योग्य असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -