घरमहाराष्ट्रनवा महिना नवे नियम : उद्यापासून वाहतूक, विमा, गॅस सिलिंडरसाठी होणार 'हे'...

नवा महिना नवे नियम : उद्यापासून वाहतूक, विमा, गॅस सिलिंडरसाठी होणार ‘हे’ बदल

Subscribe

मुंबई : ऑक्टोबर महिन्याचा आजचा शेवटचा दिवस असून उद्यापासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात होत आहे. उद्या, 1 नोव्हेंबरपासूनच काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यामध्ये वाहतूक, विमा, गॅस सिलिंडर सेवा यांचा समावेश आहे.

मोटारीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी सीटबेल्टचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. त्यानुसार, मंगळवार, 1 नोव्हेंबरपासून सीटबेल्टचा वापर न केल्यास कारवाई केली जाणार आहे. शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे माजी आमदार विनायक मेटे तसेच प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे काही दिवसांपूर्वी कार अपघातात निधन झाले. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी हा नियम लागू होणार असल्याचे जाहीर केले होते.

- Advertisement -

गॅस सिलिंडर वितरणात बदल
गॅस सिलिंडरच्या बाबतीतही दोन बदल होणार आहेत. दर महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलिंडरच्या दरात वाढ किंवा कपात होते. त्यामुळे उद्या सर्वसामान्य ग्राहकांना की व्यावसायिक सिलिंडरधारकांना दिलासा मिळतो का? की दोघांनाही दरवाढीचा फटका सहन करावा लागतो? हे पाहावे लागेल. याशिवाय, गॅस सिलिंडर वितरणातही महत्त्वाचा बदल होणार आहे. गॅस सिलिंडर बुक केल्यावर संबंधित ग्राहकाच्या रजिस्टर मोबाईलवर एक ओटीपी पाठवला जाईल. तो वितरकाच्या एजंटला दिल्यावर ग्राहकाला सिलिंडर मिळेल.

सर्व विमा पॉलिसीसाठी केवायसी बंधनकारक
सर्व प्रकारच्या विमा पॉलिसींसाठी उद्यापासून केवायसी बंधनकार करण्यात आले आहे. विमा कंपन्यांची नियमाक संस्था असलेल्या ‘इरडा’ने (Insurance Regulatory and Development Authority) तशा सूचना प्रत्येक कंपनीला दिल्या आहेत. आता आयुर्विमा, आरोग्य तसेच अन्य सर्वसाधारण विमा या सर्वांसाठी ग्राहकांना केवायसी आवश्यक आहे. आतापर्यंत केवायसी केवळ आयुर्विमा पॉलिसींसाठी आवश्यक होते.

- Advertisement -

व्यापाऱ्यासाठी जीएसटी नियमांत बदल
व्यापाऱ्यांसाठी जीएसटीच्या नियमात बदल होणार आहे. आता 5 कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्यांना विवरणपत्र भरताना चार अंकी एचएसएन कोड देणे बंधनकारक आहे. पूर्वी हा कोड दोन अंकी होता. तर, 5 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या करदात्यांना सहा अंकी कोड टाकणे 1 ऑगस्टपासून बंधनकारक करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -