मुंबईतील ‘हे’ भाग भूकंपासाठी धोकादायक, नव्या-जुन्या इमारती किती सक्षम?

Earthquakes in Mumbai | भारतीय मानक ब्युरोने देशातील भूकंपासाठी पाच वेगवेगळे झोन तयार केले आहेत. पाचवा झोन सर्वांत धोकादायक झोन आहे. तर त्याखालोखाल चौथा झोन येतो. मुंबई झोन चारमध्ये येत असल्याने मुंबईसाठीही ही धोकादायक बाब आहे.

new zealand earthquake magnitude 6 1 hits north west of wellington check details

Earthquakes in Mumbai | मुंबई – तुर्की आणि सीरिया देश भूकंपाने (Earthquakes) हादरले आहेत. या दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. तुर्की (Turkey) आणि सीरियाच्या (Syria) भूकंपानंतर जगभरातील देशांनी धास्ती घेतली असून त्यानुसार उपाययोजनांना सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे भारतातही भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या ठिकाणी संशोधन सुरू झाले आहे. अशाचप्रकारे जर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीतही भूकंप आला तर येथील टोलेजंग इमारती भूकंपाचा झटका सहन करू शकतील का? हा मोठा प्रश्न मुंबईकरांना भेडसावत आहे. भारतीय मानक ब्युरोने देशातील भूकंपासाठी पाच वेगवेगळे झोन तयार केले आहेत. पाचवा झोन सर्वांत धोकादायक झोन आहे. तर त्याखालोखाल चौथा झोन येतो. मुंबई झोन चारमध्ये येत असल्याने मुंबईसाठीही ही धोकादायक बाब आहे.

लांबलचक पसरलेल्या चाळी जाऊन मुंबईत आता टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. ३० ते ४० मजली इमारती मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र या इमारतींचे बांधकाम करताना भूकंपाचे कमी तीव्रतेचे धक्के सहन करू शकतील असं त्यांचं बांधकाम करण्यात आलं आहे. कारण सध्या इमारतींचे काम अर्थक्वेक कोडनुसार केले जाते. मात्र, जास्त तीव्रतेचा भूकंप झाल्यास या इमारतींना धोका बसू शकतो.

हेही वाचा – भारतात तुर्कीसारखा भूकंप झाला तर? देशातील ‘या’ राज्यांना सर्वाधिक धोका

मुंबईत काही इमारती जुन्या झाल्या आहेत. ५० हून अधिक वयोमान या इमारतींचं असून या इमारतींना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. मात्र, पालिकेच्या नोटिसांना धुडकावत अनेक कुटुंबे येत राहत आहेत. तर, काहींनी न्यायालयात धाव घेत नोटिशींनाच स्थगिती आणली आहे. त्यामुळे मुंबईत भूकंपाचे धक्के जाणवल्यास या जुन्या इमारतींना सर्वाधिक धोका असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय.

मुंबई हे बेटांचं शहर आहे. बेटांवर भराव टाकून येथे शहर वसवण्यात आलं आहे. त्यामुळे ज्याठिकाणी सर्वाधिक भराव टाकला आहे तिथे भूकंपाचा धोका सर्वाधिक आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर येथे भूकंपाचे केंद्र आहेत. पालघरमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असतात. मुंबई-ठाण्यात तुलनेने भूकंपाचे धक्के कमी जाणवतात. गोवंडी, शिवाजीनगर, घाटकोपर, भांडुप, विद्याविहार आणि मुलुंड हे भूकंपाचे धोकादायक भाग आहेत. त्यामुळे, मुंबई हे भूकंपप्रवण क्षेत्राच्या चार झोनमध्ये आहे. तर, देशातील जवळपास १८ टक्के भाग झोन चारने व्यापला आहे. त्यामुळे मुंबईत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यास फारसा परिणाम होणार नाही. परंतु, तीव्र धक्क्यांमुळे मुंबई पुरती हादरू शकते, असं सांगण्यात येतंय.

हेही वाचा – भारतात भूकंप येण्याची शक्यता, NGRIच्या शास्त्रज्ञाने दिला इशारा