Maharashtra Assmebly Budget 2023 | मुंबई – अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा पहिला अर्थसंकल्प आज जाहीर केला. अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असून ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित अर्थसंकल्प असल्याचं अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. पंचामृत ध्येयावर आधारित हा अर्थसंकल्प 13,437 कोटी रुपयांचा आहे. आजच्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामुळे शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वच संवर्गातील घटकाला दिलासा मिळाला आहे. आजच्या अर्थसंकल्पातील दहा मोठ्या घोणषा पाहुयात.
शिवमहोत्सवासाठी ३५० कोटींची तरतूद
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये
- आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान: 50 कोटी
- मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये
- शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन : 300 कोटी रुपये
प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
- राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
- प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
- केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
- 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
- 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार
- आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्यांकडून
- आता शेतकर्यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता
- शेतकर्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा
- 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार
मासेमार कुटुंबांच्या कल्याणासाठी 50 कोटींचा मत्स्यविकास कोष विमा आणि डिझेल अनुदानाचा दिलासा
- प्रकल्पबाधित मासेमारांना नुकसानभरपाईसाठी धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य
- प्रकल्पामुळे विस्थापित वा तात्पुरत्या प्रभावित मासेमार कुटुंबांना मदत देण्यासाठी प्रकल्पाच्या 2 टक्के वा 50 कोटी रुपयांचा मत्स्यविकास कोष
- मासेमारांना डिझेल अनुदानासाठी यांत्रिक नौकेच्या 120 अश्वशक्तीची अट काढली
- त्यामुळे 85 हजार अधिकच्या मासेमारांना लाभ
- वर्षानुवर्षाचा अनुशेष यावर्षी पूर्णत: दूर करणार
- यासाठी 269 कोटी रुपयांची तरतूद
- पारंपारिक मासेमारी करणार्या मासेमार बांधवांसाठी केंद्राच्या मदतीने 5 लाखांचा विमा
महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट
- राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत
- चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
- महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
- कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
- मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
- महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
- माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार
इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’
- प्रधानमंत्री आवास योजना: 4 लाख घरे (2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, 1.5 लाख इतर प्रवर्ग)
- रमाई आवास : 1.5 लाख घरे/1800 कोटी रुपये (किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी)
- शबरी, पारधी, आदिम आवास : 1 लाख घरे/1200 कोटी रुपये
- यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत: 50,000 घरे/600 कोटी (25,000 घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी धनगर : 25,000 घरे)
- तर मागासवर्गियांसाठी नवीन घरकुल योजना : मोदी आवास घरकुल योजना : 3 वर्षांत 10 लाख घरे /12,000 कोटी रुपये (या योजनेत यावर्षी 3 लाख घरे बांधणार/3600 कोटी रुपये)
पायाभूत सुविधा
समृद्धी अन् शक्तिपीठ महामार्ग….
- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार, सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता
- पवनार (वर्धा) ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग/86,300 कोटी रुपये (नागपूर-गोवा)
- (माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई ही शक्तीपीठे, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर जोडले जाणार)
- या महामार्गाचा हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना लाभ
रस्त्यांसाठी निधी…
- पुणे रिंगरोडसाठी भरीव निधीची तरतूद
- मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या कामासाठी निधी
- विरार-अलिबाग मार्गासाठी निधीची तरतूद
- रायगड जिल्ह्यातील रेवस ते रेड्डी, सिंधुदुर्ग सागरी महामार्गासाठी निधी
- हायब्रीड अॅन्युईटीतून 7500 कि.मी.चे रस्ते/90,000 कोटी रुपये
- आशियाई बँक प्रकल्पातून 468 कि.मी.चे रस्ते/4000 कोटी रुपये
- रस्ते व पुलांसाठी 14,225 कोटी रुपये, यातून 10,125 कि.मी.चे कामे, 203 पूल व मोर्यांची कामे
- जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग : 4500 कि.मी./3000 कोटी रुपये
- प्रधानमंत्री ग्रामसडक योजना : 6500 कि.मी.
- मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद शेतरस्त्यांसाठी नवी योजना
- सीमावर्ती भागातील गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यासाठी योजना
मुंबईचा सर्वांगिण विकास
- मुंबईच्या सुशोभिकरणासाठी : 1729 कोटी रुपये
- एमएमआर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल यावर्षी पूर्ण
- ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडणार: 424 कोटी रुपये
- गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लबनजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांचे निर्माण : 162.20 कोटी
विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, मोठी वाढ विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत
- 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये
- 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार
पर्यटनाला चालना
- प्रत्येक जिल्ह्यातील 500 युवकांना जल, कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटन तसेच आदरातिथ्य क्षेत्राचे प्रशिक्षण
- पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास
- 10 पर्यटन स्थळांवर टेंट सिटी उभारणार
- राज्याचा वार्षिक महोत्सव आराखडा तयार. यात शिवजन्मोत्सव शिवनेरी, भगवान बिरसा मुंडा महोत्सव, जव्हार, वीर बाल दिवस महोत्सव नांदेड इत्यादींचा समावेश
सशक्त युवा…. खेळांना प्रोत्साहन
- खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध
- बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारणार
- पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ/50 कोटी रुपये देणार
- हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देऊन अनुदान
- नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी 100 कोटी रुपये