घर महाराष्ट्र राज्य सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीत मराठा समाजासाठी 'हे' तीन महत्त्वाचे निर्णय; मनोज जरांगेंची...

राज्य सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीत मराठा समाजासाठी ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय; मनोज जरांगेंची माहिती

Subscribe

जालना : सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत पहिल्यांदाच बैठक घेतली. या सर्वपक्षीय बैठकीत मराठा आरक्षणाच्या बाजूने ठराव मांडला, अशी माहिती आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी ग्रामस्थानसह राज्यभरातील मराठा समाजाला सांगितले. यावेळी राज्य सरकारने काल झालेल्या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “गेल्या पाच दशकापासून निर्णयाच्या प्रक्रिये मराठा आरक्षण येत नव्हता. पण आता येत येत आहे. मी तुमच्यासमोर पारदर्शक निर्णय घेतो. मी जे बोलतोय त्यांचा सर्वांनी अभ्यासपूर्ण विचार करावा. यानंतर तुमचा विचार हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आपल्या समाजाच एक विचार आणि एक मत असले पाहिजे. कारण तु्म्ही माझे मी तुमचा आहे. आपण एकमेंकाच्या विचाराने बोलतो. मराठा समाज हा माझ्यासाठी माय-पाप आहे.

समाजासाठी जीवाची बाजी लावणार

- Advertisement -

“निर्णयाच्या प्रक्रियेत मराठा आरक्षण येत नव्हते. हे आरक्षण निर्णय प्रक्रियेत आणण्याचे काम या सर्व बहाद्दर मराठ्यांनी केले आहे. मी तुमच्यासाठी झिजणार आणि जीवाची बाजी लावणार आहे. मी समाजाच्या हिताच्या निर्णय घेणार आहे आणि आपण एकत्र असल्याने सरकरा आपल्यासमोर झुकले”, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या बैठकीसंदर्भात मनोज जारांगे पाटली म्हणाले, “भारत स्वातंत्र झाल्यापासून आतापर्यंत एक पक्षाने एकत्र येवून बैठक घेतली नाही. काल सर्वपक्षांनी एकत्र येवून बैठक घेतली. आणि एक मताने मराठा आरक्षणासंदर्भात ठराव केला. मराठा समाजाला 75 वर्ष राजकीय लोकांचा मान सन्मान वाढवण्यासाठी काम केले. आता पाळी तुमची आहे. आमच्या उपकाराची परत फेड करायची. कारण मराठ्याचा मुलगा बर्बाद व्हायाला लागलाय. मराठा समाजाने भरभरून मते दिले. आता तुमची वेळ आहे. आता सर्व जण एकत्र येवून माज्या मराठा मुलांच्या पाठिमागे उभे राहा आणि सरकारने काल मराठा मसाजाच्या पाठिशी उभे राहण्याचा ठराव केला.”

- Advertisement -

हेही वाचा – शिंदे लबाड नाहीत आणि फडणवीस, अजित पवार हे बेईमान नाहीत; भिडे गुरुजींकडून सत्ताधाऱ्यांचं कौतुक

सर्वपक्षीय बैठकीत घेतले हे तीन निर्णय

  • भारत स्वातंत्र झाल्यापासून आतापर्यंत एक पक्षाने एकत्र येवून बैठक घेतली नाही. काल सर्वपक्षांनी एकत्र येवून बैठक घेतली. आणि एक मताने मराठा आरक्षणासंदर्भात ठराव केला.
  • महाराष्ट्रात आंदोलनात ज्या मराठा समाजाच्या लोकावर केसेस झाल्या होत्या. त्या सर्व केसेस मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने कालच्या बैठकीत घेतला आहे.
  • ज्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले होते. राज्य सरकारने कालच्या बैठकीत मोठ्या तीन अधिकाऱ्यांना सस्पेंड केले. ज्यांनी ज्यांनी आपल्या राज्यभरात महिलांवर हात उचलला होता. आता ते सर्वजण सस्पेंड होणार आहेत. हे निर्णय राज्य सरकारने काल घेतले आहेत.

 

- Advertisment -