घर ठाणे thane मध्य रेल्वेच्या 'या' दोन वर्दळीच्या रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

मध्य रेल्वेच्या ‘या’ दोन वर्दळीच्या रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

Subscribe

डोंबिवली : मध्य रेल्वेची सर्वाधिक वर्दळ असलेलेल डोंबिवली आणि मुलुंड या रेल्वे स्थानांचा कायापाटल करण्यात येणार आहे. यासंदर्भात मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्ट एमयुटीपी फेज-3ए प्रकल्पांतर्गत 120 कोटी रुपये खर्च होणार आहेत. डोंबिवली आणि मुलुंड रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

येत्या ऑक्टोबर महिन्यात डोंबिवली स्थानकाच्या कामाला सुरुवात होईल. डोंबिवली रेल्वे स्थानकात 11 कोटी रुपये खर्च करून इलेक्ट्रिकल कामे, सिग्नल अॅण्ड टेलिकम्युनिकेशन सेवा सुधारण्यात येणार आहे, अशी माहिती एमआरव्हीसीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासीन यांनी दिली आहे. डोंबिवली आणि मुलुंड रेल्वे स्थानकाच्या पाठोपाठ मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील सुमारे 17 रेल्वे स्थानकांच्या विकासाचे पूर्ण नियोजन केले आहे, असेही सुनील उदासीन यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा  – डोंबिवलीतील मासळी मार्केटचा अखेर पुनर्विकास होणार

मासळी मार्केटचा रखडलेला पुनर्विकासासाठी प्रयत्न सुरू

डोंबिवली शहरात पश्चिमेला स्टेशन लगत एकच मासळी मार्केटची दुरावस्था झाली आहे. गेल्या 15 वर्षापूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सर्वसाधारण सुभेने मासळी बाजार इमारतीचा पुनर्विकास करण्याचा प्रस्थाव मंजूर केला होता. तेव्हा या प्रकल्पासाठी तीन कोटी 33 लाख रुपयांचा खर्च पालिकेने प्रस्तावित केले होते. पण श्रेयवादा आणि स्थानिक राजकारणामुळे मासळी बाजाराचा पुनर्विकास झाला नाही. पण आता माजी शिवसेना नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पालिका प्रशासनाने रखडलेला विषय मार्गी लावत निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही रखडलेल्या या पुनर्विकासाला अनुकुलता दाखविली त्यामुळे हा विषय मार्गी लागला. प्रशासनाच्या मंजुरीनंतर आता निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisment -