घरताज्या घडामोडीम्हशीच्या गोठ्यातून आले अन १२ लाखांचे दागिने घेवून पळाले

म्हशीच्या गोठ्यातून आले अन १२ लाखांचे दागिने घेवून पळाले

Subscribe

म्हशीच्या गोठ्यातून घरात प्रवेश करत चोरट्याने सुमारे १४ लाखांचे सोने व चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना हनुमानवाडीतील शिंदे मळा परिसरात गुरुवारी (दि.२७) पहाटे घडली. याप्रकरणी जनार्दन लक्ष्मण शिंदे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमानवाडी येथील शिंदे मळ्यात जनार्दन शिंदे कुटुंबियांसह राहतात. शिंदे यांच्यासह सर्वजण घरात झोपले होते. गुरुवारी पहाटे चोरट्यांनी शिंदे यांच्या घरामागील जनावरांच्या गोठ्यातून त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सुमारे २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ५ तोळे चांदीचे दागिने व ४५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. सकाळी शिंदे कुटुंबातील सदस्य नेहमीप्रमाणे जागे झाले असता घरातील कपाट उघडे दिसले. कपाटातील कपडे जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटातील दागिने ठेवलेला बॉक्स रिकामा दिसला. त्यावरून घरात चोरी झाल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेत घरफोडी झाल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -