जळगाव : शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज जळगावमध्ये (Jalgaon) जाहीर सभा घेणार आहेत. त्याआधी त्यांनी जळगाव महापालिकेतील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांचं मराठवाडा मुक्तिसंग्रामात फार मोठं योगदान आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी मराठवाड्यात जशी कारवाई केली, तशी कारवाई मणिपूरमध्ये करण्याची मोदी सरकारची हिंमत नाही. ते स्वतःला पोलादी पुरुष म्हणवून घेत असतील मात्र ते तकलादू पुरुष आहेत, अशी सडकून टीला उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (They may call themselves men of steel but Thackerays criticism of Modi)
जळगाव महापालिकेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, या पुतळ्याच्या वितरण सोहळ्याला उत्ससाहाने उपस्थित राहीलात याचं मला कौतुक आहे. मी आज तुमच्या सोबत बोलण्यासाठी याठिकाणी उभा राहिला आहे, मात्र हा स्टेज हलत आहे. मी मनात विचार केला असा स्टेज कसा हलत आहे. एकूणच केंद्र सरकार आता डगमगायला लागला आहे. याचं हे प्रतिक आहे, केंद्र सरकार हलत आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
हेही वाचा – ठाकरेंच्या जळगाव दौऱ्याआधी महाराष्ट्र शासनाचं महापालिका आयुक्तांना पत्र; संजय राऊत म्हणतात…
आज मला माझ्या महापौर, उपमहापौर आणि सर्व सहकाऱ्यांचा अभिमान आहे. कारण पुतळा कोणाचाही उभा करता येतो, पण पोलादी पुरुष म्हणून नुसत्या कामाचे नाही तर कामाचेही कौतुक व्हयला पाहिजे. नाव लावून कोणी काहीही करू शकतो. पण काम करून एखादी पदवी म्हणण्यापेक्षा उपाधी ही जनतेने द्यायची असते. अशी काही तुरळक माणसं, व्यक्तिमत्त्व होऊन गेली आहेत, त्यातले एक पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल हे एक व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचा पुतळा महापालिकेच्या आवारात उभारला आणि त्याचं अनावरण करण्याची संधी मला दिली म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांचे आभार मानले.
मोदी सरकार कामाची उंची कधी गाठणार
सरदार वल्लभभाई पटले यांच्याबद्दल बोलताना उद्धव म्हणाले की, वल्लभभाई पटेल दूरदृष्टीचे होते. त्यांनी त्या काळामध्ये आरएसएसवर बंदी आणली होती. त्यांना स्वातंत्रप्रेम, देशप्रेम म्हणजे काय हे पक्क कळत होतं. मोदी सरकारने गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात मोठा पुतळा उभा केला आहे. त्या पुतळ्याची उंची ठीक आहे, पण कामाची उंची कधी गाठणार, असा टोला उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे काम केलेले आहे, ती उंची तरी गाठा, असही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
हेही वाचा – पंतप्रधान मोदी लोकांची चांगली करमणूक करीत आहेत…, संजय राऊत यांची टीका
इंडिया नाव दिल्यानंतर सत्ताधाऱ्यांना खास सुटली
सरदार वल्लभभाई पटेल यांनी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा स्वातंत्र केला. कारण आपल्या भारतामध्ये, आता भारत बोललं पाहिजे. कारण इंडियाची Allergies काही जणांना झाली आहे. इंडिया म्हटल्यावर त्यांना खाज सुटायला लागली आहे. आजपर्यंत इंडिया-इंडियाचा गवगवा होता. वोट फॉर इंडिया. मात्र आता विरोधीधकांनी त्यांच्या आघाडीला इंडिया नाव दिल्यानंतर त्यांना खाज सुटली आहे, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर सोडले.
वल्लभभाई पटेलांमुळे मराठवाडा आपल्या देशात
सरदार वल्लभभाई पटले यांनी 17 सप्टेंबर रोजी मरठवाडा पूर्ण आपल्या देशात सामील करून घेतला. ती तारीख आता येत्या चार-पाच दिवसांत येत आहे. विशेष म्हणजे त्यावेळी जिन्नांचं निधन झालं होतं. त्यामुळे काही म्हणले आपण कारवाई पुढे ढकलूया. पण वल्लभभाई म्हणाले आज म्हणजे आजच, असे म्हणत त्यांनी फौजा घुसवल्या आणि नीजामाला हुसकावलं, रझाकारांचे अत्याचार थांबवले आणि मराठवाडा अभिमानाने आपल्या देशात सामील करून घेतला.
हेही वाचा – राजशिष्टाचार आम्हाला शिकवायची गरज नाही…, ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले
नरेंद्र मोदी पोलादी पुरुष नाही तर तकलादू पुरुष
आज आपण पुतळे उभारतोय पण जशी मराठवाड्यात वल्लभभाई पटेल यांनी कारवाई केली, तशी मणिपूरमध्ये कारवाई करण्याची हिंमत मोदी सरकारमध्ये होत नाही. ते स्वतःला पोलादी पुरुष म्हणवून घेतात. मात्र ते पोलादी पुरुष नाही तर कलादू पुरुष आहे, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली. तसेच या कारभाराचा आता आपल्याला सोक्षमोक्ष लावायचा आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना दिला.