Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शिवसेना नेत्याच्या खिशातील 50 हजार रुपये चोराने केले लंपास, सांगलीतील OBC मेळाव्यातील...

शिवसेना नेत्याच्या खिशातील 50 हजार रुपये चोराने केले लंपास, सांगलीतील OBC मेळाव्यातील घटना

Subscribe

सांगलीमध्ये ओबीसी नेते आणि मदत व पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून ५० हजार रुपयांचे बंडल एका चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. व्यासपीठावर गर्दीचा फायदा घेत चोराने शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या खिशातून पैशांचे बंडल चोरले आहे. पैसे चोरी करतानाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या चोराचा शोध घेत आहेत.

सांगलीमध्ये काही दिवसांपूर्वी ओबीसी मेळावा पार पडला या मेळाव्यात ओबीसी नेते आणि मदत व पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हजेरी लावली होती. गर्दीचा फायदा घेत एका भुरट्या चोराने चक्क मेळाव्यात उपस्थित असलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातील रोख रक्कम 50 हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. चक्क भर व्यासपीठावरून चोराने जिल्हा प्रमुखाच्या खात्यातून 50 हजार रुपये लंपास केले. इतकंच काय तर चोरट्याने सेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांचा खिसा कापतानाची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हिमध्ये कैद झाली आहे.

- Advertisement -

सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांना ओबीसी मेळाव्या दरम्यान चांगलाच भूर्दंड बसला आहे. चोरट्याने गर्दीचा फायदा घेत जिल्हा प्रमुखाचा खिसा साफ केला. सांगली स्टेशन चौकात कॅंग्रेस नेते आणि मदत व पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ओबीसी मेळाव्यादरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला आहे. स्टेजवर जाऊन चोरट्याने शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून नोटांच बंडल लंपास करण्याची हिंमत केली. व्यासपीठावर असलेल्या गर्दीचा फायदा घेत त्याने नोटा लांबवल्या आहेत. या संपूर्ण घटनेनंतर संजय विभूते यांनी या घटनेची सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सध्या पोलीस या भूरट्या चोराचा शोध घेत आहेत.


हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांना आज शेवटची संधी, अन्यथा उद्यापासून कठोर कारवाई होणार, अजित पवारांचा पुन्हा इशारा

- Advertisement -
- Advertisement -
Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -