घरताज्या घडामोडीपीपीई किट घालून चोरट्यांचा घरफोडीचा प्रयत्न फसला, घटना कॅमेरात कैद!

पीपीई किट घालून चोरट्यांचा घरफोडीचा प्रयत्न फसला, घटना कॅमेरात कैद!

Subscribe

पिंपरी – चिंचवडमध्ये चोरट्यांनी पीपीई किट घालून घरफोडीचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबबत चिखली पोलीस ठाण्यात गुम्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी रविवारी चिखली घरकुल येथे चार चोरटे बंद घरे हेरून चोरीचा प्रयत्न करीत होते. या चौघांनी पीपीई किट घातले होते. याबाबतचे चित्रण असलेले सीसीटीव्हि फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.

शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा दररोज हजारोंच्या संख्येने वाढत आहे. त्यातच रूग्णांवर उपचार करताना आवश्यक असलेली उपकरणे डॉक्टर आणि वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांना वेळेत उपलब्ध होण्यावरून वादाचे प्रसंग घडले आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना चोरटे पीपीई किट घालून बंद घरात चोरी करण्याचा प्रयत्न करीत होते.

- Advertisement -

घरकुल परिसरात आलेल्या या चार चोरट्यांनी बंद घरे हेरून ठेवली असल्याचेही प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. या चोरट्यांनी एका घराच्या लोखंडी दाराच्या कडीकोयंडा तोडला. परंतु, तेवढ्यात आवाज झाल्याने या चार चोरट्यांनी तेथून पळ काढला. या चारही चोरट्यांकडे कटावणी, लोखंडी पक्कड आदी साहित्य असल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या चौघांना चोरी करता आली नाही. परंतु त्यांनी पीपीई किट कुठून मिळविले, त्याचा कोरोना‌ उपचार केंद्राशी काही संबंध आहे का? चिखली आणि गुन्हे शाखेच्या पथकाकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.


हे ही वाचा- डी.एड असून सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या रेश्माचा वंचित मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -