घरताज्या घडामोडीदुचाकी वाहने चोरणारे अट्टल चोरटे गजाआड

दुचाकी वाहने चोरणारे अट्टल चोरटे गजाआड

Subscribe

४ पल्सर, १ एफझेड जप्त, शहर गुन्हे शाखेची कारवाई

संशयितरित्या दुचाकीजवळ उभे असलेल्या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता दोघेजण अट्टल दुचाकीचोर असल्याचे उघड झाले. पोलिसांच्या त्यांच्य ताब्यातून ४ पल्सर व एक एफझेड दुचाकी जप्त केली आहे. या चोरट्यांकडून आणखी दुचाकी जप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संदीप नामदेव पवार (१९, रा. नवेगाव, ता. सटाणा), अंकुश अनिल सावंत (२४, रा.निंबोळा, पो. धांद्री, ता. सटाणा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

6 जुलै ते ७ जुलै २०२० या कालावधीत नाशिक शहर गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना आडगाव उड्डाण पुलाच्या पुढे प्रताप ढाब्याजवळ दोनजण संशयितरित्या दुचाकी (एमएच ४१-बीए-०६३१)जवळ उभे असलेले दिसले. संशय आल्याने पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, पोलीस नाईक दिलीप मोंढे, पोलीस हवालदार नाझीम पठाण यांनी दोघांना हटकले असता दोघेजण घाबरले. पोलिसांनी त्यांना कोठे चालले आहात, येथे कशासाठी थांबले आहात, असे विचारले असता दोघांनी सटाणा येथे जात असल्याचे सांगितले. पथकाला संशय आल्याने दुचाकीचा मालक व दुचाकीच्या क्रमांकाबाबत विचारणा केली असता दोघेजण घाबरले. पोलिसांनी दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता दोघांनी सिडकोतील पवननगर बसस्टॉपसमोरील घरासमोरून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पथकाने अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात दोघांना अटक केली. त्यांच्याकडून अंबड पोलीस ठाणे हद्दीतील ३, ओझरमधील एक आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. पुढील तपास पोलीस हवालदार कोकाटे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -