घरताज्या घडामोडीCorona Third Wave: राज्यात जुलै-ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाट, तयारीवर टोपे म्हणाले...

Corona Third Wave: राज्यात जुलै-ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाट, तयारीवर टोपे म्हणाले…

Subscribe

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, कोरोना लस याचा अधिक तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी अनेक देश राज्याला मदत करत आहे. पण राज्यात जुलै-ऑगस्ट दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालंच पाहिजे, अशा सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज तीन तासांच्या झालेल्या चर्चेमध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ऑक्सिजन काटकसरीने करणे. त्यामुळे ऑक्सिजन ऑडिट केले पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात जुलै-ऑगस्टदरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यापूर्वीच सर्वच पद्धतीने आपण ऑक्सिजनमध्ये परिपूर्ण असलो पाहिजे. तिसऱ्या लाटेच्या अगोदर ऑक्सिजन नाही, असे ऐकूण घेतले जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिला आहे. मग त्यामध्ये आपण स्वयंपूर्ण असलो पाहिजे. प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतःच ऑक्सिजन जनरेटर प्लांट असला पाहिजे. लिक्विट ऑक्सिजन असेल तर ऑक्सिजनचा स्टोअरेज टँक असला पाहिजे. मोठ्या संख्येने ऑक्सिजन कंसंट्रेटर असेल पाहिजे. ऑक्सिजनसाठी आज जी धावपळ आहे, ती असता कामा नये, असे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Lockdown 2021: राज्यातील लॉकडाऊन १५ मेपर्यंत वाढवला


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -