घरमहाराष्ट्रराज्यात कोरोनाची तिसरी लाट जानेवारी अखेरपर्यंत उच्चांक गाठणार

राज्यात कोरोनाची तिसरी लाट जानेवारी अखेरपर्यंत उच्चांक गाठणार

Subscribe

राज्यात कोरोना रुग्णसंख्या जानेवारी अखेरपर्यंत उच्चांक गाठेल. त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख कमी होईल, अशी खळबळजनक माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा दर मोठा असून कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर कोणताही ताण नसून 85 टक्के रुग्ण हे कोणतीही लक्षणे नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आता जिल्हा स्तरावर होम आयसोलेशन किट तयार करण्यात येणार असून टेस्टिंगची संख्या वाढवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात ज्या ठिकाणी लसीकरण जास्त झाले आहे, त्या ठिकाणी मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे लसीकरणाची गती आणखी वाढवण्यावर भर देणार आहे. राज्यातील जवळपास 90 टक्के लोकांनी कोरोनाची पहिली लस घेतली असून 69 टक्के लोकांनी दोन्ही लसी घेतल्या आहेत.

- Advertisement -

देशभरात क्वारंटाईनचा कालावधी हा सातच दिवस राहणार, त्यात कोणताही बदल होणार नाही, असे केंद्राने सांगितल्याचे राजेश टोपे म्हणाले. राज्यात सध्या एक लाख 73 सक्रिय रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्येमध्ये 85 टक्के लोक हे लक्षणे नसलेली आहेत तर 13 टक्के लोकांना सौम्य लक्षणे असल्याचे समोर आले आहे, असे राजेश टोपे म्हणाले. सात दिवसांच्या होम क्वॉरंटाईनमध्ये राज्य सरकारकडून पहिल्या, पाचव्या आणि सातव्या या दिवशी कॉल केले जाऊन त्या रुग्णांची नोंद ठेवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंगवर भर
चाचण्या वाढवा. ट्रॅकींग, ट्रेसिंग आणि टेस्टिंग यावरच भर द्या. कोविडच्या नियमांचे पालन आवश्यक आहे. लसीकरणावर भर द्या, अशा सूचना केंद्रीय मंत्र्यांनी दिल्याचे टोपे यांनी सांगितले.

- Advertisement -

क्वॉरंटाइन रुग्णांना तीन वेळा कॉल
राज्यात आरोग्य विभागाचा डॅशबोर्ड तयार केला जाणार आहे. या कॉल सेंटरवरून रुग्णाला विलगिकरणच्या कालावधीत कॉल करून प्रकृतीची विचारणा केली जाईल. पहिल्या, पाचव्या आणि सातव्या दिवशी या रुग्णांना कॉल केले जातील. रुग्णाला अडचण आल्यास त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात यावे यासाठी ही प्रकिया सुरू करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

रुग्णांना घरपोच उपचार किट
कोरोना रुग्णांना घरपोच उपचारांचे कीट पोहोचवले जाणार आहे. त्यात २० मिली सॅनिटायझर, १० मास्क, माहिती पुस्तिका, १० पॅरिसिटामॉल गोळ्या, २० मल्टिव्हिटॅमिनच्या गोळ्यांचे हे किट जिल्हाधिकार्यांमार्फत रुग्णांपर्यंत पोहोचेल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -