झुंड चित्रपटातील ‘या’ कलाकारावर चोरीचा आरोप, पोलिसांनी केली अटक

चोरी केल्यानंतर या वस्तू नागपुरातील गड्डीगोदाम परिसरातील एका कबुतराच्या पेटीत ठेवण्यात आल्या होत्या. झुंड या चित्रपटासाठीही या स्थळाचे चित्रिकरण झाले आहे.

नागपूर – झुंड चित्रपटातील एका अभिनेत्याला चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. प्रियांशू क्षत्रिय याला गुरुवारी नागपूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. नागराज मंजुळे दिग्दर्शित झूंड चित्रपटात त्याने बाबू ही व्यतिरेखा साकारली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

प्रियांशू क्षत्रिय याने नागपूरमधील मनकापूर भागातील ६४ वर्षीय प्रदीप मोंडावे यांच्या घरात सोन्याचे दागिने आणि पाच लाख रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रदीप मोंडावे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला पकडले होते. त्याने प्रियांशू क्षत्रियाचं नाव घेत त्यानेही या चोरीत मदत केल्याची माहिती दिली. दरम्यान, मंगळवारी पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

चोरी केल्यानंतर या वस्तू नागपुरातील गड्डीगोदाम परिसरातील एका कबुतराच्या पेटीत ठेवण्यात आल्या होत्या. झुंड या चित्रपटासाठीही या स्थळाचे चित्रिकरण झाले आहे.