घर महाराष्ट्र 'आपलं बोलून मोकळं व्हायचं' म्हणणारे हे सरकार..., सुप्रिया सुळेंचे पुन्हा एकदा हल्लाबोल

‘आपलं बोलून मोकळं व्हायचं’ म्हणणारे हे सरकार…, सुप्रिया सुळेंचे पुन्हा एकदा हल्लाबोल

Subscribe

मुंबई : भाजपाचे आमदार राम कदम यांच्या निवासस्थानी राजस्थानमधील एक बाबा दिव्यांग व्यक्तींवर उपचार करत असल्याचे सोशल मीडियावरील पोस्टवरून समोर आले आहे. त्यावरून पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल करताना, महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात असूनही कारवाई होत नाही, ही खेदाची बाब असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा – संजय राऊतांच्या ‘रोखठोक’ प्रश्नांचा मुख्यमंत्री शिंदेंना करावा लागणार ‘सामना’?

- Advertisement -

राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यात कंबलवाले बाबाचे प्रकरण समोर आले आहे. असाध्य रोगांवर तात्काळ उपचार देत असल्याचा दावा या बाबाचा आहे. कंबल वाले बाबा हा मूळचे गुजरातचे रहिवासी असून त्याचे मूळ नाव गणेश भाई गुर्जर आहे. वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकी 15 दिवसांची विशेष शिबिरे आयोजित करून लोकांना बरे करण्याचा त्याचा दावा आहे. या शिबिरामध्ये बाबाच्या घोंगडीला स्पर्श केल्यानंतर किंवा बाबाचा हात धरल्यानंतर आराम पडल्याचा दावा अनेकांनी केला आहे. तर, यामुळे आपल्या तब्येतीत काहीही फरक पडला नसल्याचे काही लोकांनी म्हटले आहे.

- Advertisement -

याच कंबलवाले बाबाने भाजपा आमदार राम कदम याच्या निवासस्थानी काही दिव्यांग व्यक्तींवर उपचार केल्याचे सांगितले जाते. त्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दिव्यांग व्यक्तींच्या अंगावर कांबळ टाकून त्यांना बरे करण्याचा दावा राजस्थान येथील एक बाबा करीत आहे. मुंबईतील घाटकोपर भागात भाजपा आमदाराच्या उपस्थितीत ती व्यक्ती महिलांना संतापजनक पद्धतीने स्पर्श करते. महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात असूनही त्याच्यावर कारवाई होत नाही ही खेदाची बाब आहे, असे ट्वीट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

हेही वाचा – राजा खातोय तुपाशी अन् शेतकरी…; मंत्रिमंडळ बैठकीवरून विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

काहीही झाले तरी ‘आपलं बोलून मोकळं व्हायचं’ म्हणणारे हे सरकार, महिलांचा अशी राजरोसपणे विनयभंग होत असताना खंबीर पावले कधी उचलणार आहे? ज्या आमदाराचा आधार घेऊन या व्यक्ती अशा पद्धतीने अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करतात त्या आमदारावर शासन कारवाई करण्याची तसदी घेणार आहे का? असे सवालही त्यांनी केले आहेत.

- Advertisment -