घर महाराष्ट्र कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी ; कशेडी बोगद्याबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी ; कशेडी बोगद्याबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Subscribe

गणपतीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. मुंबई-गोवा हायवेवर रत्नागिरी व रायगड जिल्हा जोडणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय असणारा बोगद्यामधील मुंबईकडून गोव्याच्या दिशेनं जाणारी एक मार्गिका सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई-गोवा हायवेवर कशेडी घाटातील बोगद्यातून एकेरी वाहतूक येत्या 11 सप्टेंबरपर्यंत हलक्या प्रवासी वाहनांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गणपतीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. मुंबई-गोवा हायवेवर रत्नागिरी व रायगड जिल्हा जोडणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय असणारा बोगद्यामधील मुंबईकडून गोव्याच्या दिशेनं जाणारी एक मार्गिका सुरू करण्यात येणार आहे. (This is an important update Mumbai Goa highway a route from Mumbai to Goa will be started in the tunnel Kashedi Ghat connecting Ratnagiri and Raigad districts)

या बोगद्यातील वाहतूक नियंत्रणासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून दोन्ही बाजूला वाहतूक पोलीस असणार आहेत. ही एक मार्गिका सुरू झाली, तरी खासगी प्रवासी बस, एसटी व वाहनांची वाहतूक बोगद्यातून होणार नाही, तर त्यांना घाटातूनच प्रवास करावा लागणार आहे. गणेशोत्सवाच्या वाहतूक व्यवस्थापन आढावा बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी गुरुवारी घेतली. या बैठकीत पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग अभियंत्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

या कशेडी बोगद्यातील कामं जवळपास पूर्ण झाली आहेत. पोलादपूर तालुक्यातील कशेडी हा अवघड वळणांचा महत्त्वाचा घाट पार करण्यासाठी तब्बल 45 मिनिटांचा वेळ लागतो. या घाटात अनेकदा जीवघेणे अपघातही होतात. कशेडी बोगद्यातील एक मार्गिका सुरू झाल्यास हा वेळ केवळ 10-15 मिनिटांवर येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.

(हेही वाचा : Tadoba Online Booking Scam: ताडोबातील ऑनलाइन बुकिंगचा मार्ग मोकळा; ठाकूर बंधूंना झटका )

गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज

- Advertisement -

गणेशभक्तांचा प्रवास सुखाचा करण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. गणेशोत्सव काळात जवळपास ३ हजार ५०० एसटी बसेस कोकणात धावणार आहेत. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती स्पेशल जादा गाड्यांना चाकरमान्यांनी दिलेल्या उत्स्फर्त प्रतिसादामुळे ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुमारे ३ हजार ४१४ गाड्या फुल झाल्या आहेत. यापैकी १ हजार ९५१ गाड्यांना ग्रुप बुकिेंगचे प्राधान्य मिळाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज दिली.

- Advertisment -