घरमहाराष्ट्रही तर मतदारांची प्रतारणा..., अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावरून अरविंद सावंतांची टीका

ही तर मतदारांची प्रतारणा…, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अरविंद सावंतांची टीका

Subscribe

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच आपल्याकडील अर्थखात्याबद्दल भाष्य केले होते. ते खाते असल्यानेच आपल्याला झुकते माप मिळत असल्याचे त्यांनी म्हटले होते. याच संदर्भात ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निधीवाटपात होत असलेला पक्षपातीपणा म्हणजे मतदारांची प्रतारणा असल्याची टीका त्यांनी केली आहे.

हेही वाचा – एखाद्या पूरग्रस्ताचे तोंड तात्पुरते बंद करू शकाल, पण…; ठाकरे गटाचा फडणवीसांवर निशाणा

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी बारामती दौऱ्यावर होते. तिथे विविध विकासकामांची पाहणीही त्यांनी केली. यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी विविध स्थानिक संस्थांना आर्थिक बळ देण्याबाबत भाष्य केले. त्याअनुषंगाने ते म्हणाले, आज माझ्याकडे अर्थ खाते आहे. त्यामुळे आपल्याला झुकते माप मिळते आहे. पण, पुढे अर्थ खाते माझ्याकडे टिकेल, नाही टिकेल, सांगता येत नाही. पुढचे कोणी सांगितले आहे, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले, अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते राहील की जाईल? तुमच्याकडे हे खाते राहणार नाही, असे कोणी त्यांना संकेत दिले आहेत का? हे प्रश्न त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित होतात.

हेही वाचा – मराठी पाट्या सक्तीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने व्यापारी संघटनांना दिला ‘हा’ सल्ला

याशिवाय, अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते असल्यानेच ते त्यांच्या आमदारांना जादा सवलती आणि निधी देत आहेत. म्हणूनच ते ‘आपल्याला झुकते माप’ मिळत असल्याचे म्हणाले. पण त्यांनी हा विचार केला पाहिजे की, निधीवाटपातील पक्षपातीपणामुळे तुम्ही राज्यातील नागरिकांवर अन्याय करीत आहात. भलेही एखाद्या मतदारसंघातून विरोधी पक्षाचा उमेदवार विजयी झाला असेल, पण त्याच मदारसंघात तुमचाही उमेदवारी होता आणि त्यालाही नागरिकांनी मतदान केले होते, हे विसरता कामा नये. त्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदाराला कमी निधी देऊन तुम्हाला मतदान करणाऱ्या नागरिकांवर तुम्ही अन्याय करत आहात. त्यांच्याशी तुम्ही प्रतारणा करत असल्याचे अरविंद सावंत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -