घरताज्या घडामोडीगणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 'ही' आहे खुशखबर!

गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘ही’ आहे खुशखबर!

Subscribe

गणेशोत्सवाला कोकणात जाणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य आणि केद्र सरकारचा नियमाच्या अधिन राहून प्रवासाचे काही नियम शिथिल करून एसटीने प्रवास करण्याची मुभा देण्याचे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या नियमांचे पालन करत गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या वाहतुकीची व्यवस्था म्हणून कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे व कोकणात एसटी बस फेर्‍या सुरू कराव्यात अशी मागणी कोकण चाकरमान्यांनी केली होती. त्यांवर परिवहन मंत्री यांनी काही दिवसापुर्वी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांसाठी अंतिम निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेणार असं सांगितलं होतं.

- Advertisement -

त्यानंतर सोमवारी प्रसार माध्यमाशी बोलताना अनिल परब यांनी सांगितले की, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांसाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र केद्र आणि राज्य सरकारचा नियमांच्या अधिन राहून प्रवासात काही नियम शिथिल करून एसटीने प्रवास करण्याची मुभा देण्यात येईल. मात्र हे करत असताना कोकणात कोरोनाच्या प्रसार होणार नाही यांची सुध्दा काळजी राज्य सरकारला घ्यायची आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि आयसीएमआरच्या गाईड लाईन आम्ही मागून घेतली आहे. त्यानूसार एसटी बसेस कोकणात सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र कोकणातील गांवातील ग्रामपंचायतीने चाकरमान्यांना गावात येत असताना १४ दिवस होम कारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांसाठी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई आणि उपनगरातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांसाठी राज्य सरकार सकारात्क आहे. मात्र कोरोना पसरणार नाही याची काळजी सुध्दा घ्यायची आहे. आयसीएमआर आणि आरोग्य विभागाच्या आम्ही गाईड लाईन मागवील्या आहेत. त्याचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल.- अनिल परब, परिवहन मंत्री


हे ही वाचा – विकृतीची हद्द! मांजरीच्या पिल्लाला जिवंत जाळले, व्हिडीओ व्हायरल!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -