घरमहाराष्ट्र...हा माज सत्तेचा, मुंब्रा शिवसेना शाखेवरून जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र

…हा माज सत्तेचा, मुंब्रा शिवसेना शाखेवरून जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र

Subscribe

मुंबई : शिवसेना शाखेवरून ठाकरे आणि शिंदे गटामध्ये ठिकठिकाणी वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंब्र्यातील शाखा ताब्यात घेत शिंदे गटाने त्यावर बुलडोझर चालवला. आता त्या ठिकाणी मोठी वास्तू उभारली जाणार आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल, शनिवारी या जागाची दूरून पाहाणी केली. त्यावरून आता वाद आणखी चिघळला आहे. त्यावर हा सत्तेचा माज असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे राजन किणे यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 50 जणांचा जमावाने 2 नोव्हेंबर 2023 रोजी मुंब्रा येथील शाखेत घुसून ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखाला बाहेर काढले. तसेच, शाखेवरील बोर्डही काढला आणि शिंदे गटाचा बोर्ड लावला. त्यानंतर शाखेवर बुलडोझर चालवून ती भुईसपाट केली. तिथे शाखेची नवी वास्तू उभी करणार असल्या शिंदे गटाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

त्यातच शनिवारी उद्धव ठाकरे यांनी मुंब्रा येथे जाऊन शाखेची पाहाणी करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शनिवारी तिथे पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. ते मुंब्र्यात गेले असता त्यांना शाखास्थळी जाण्यास पोलिसांनी रोखले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पोलिसांशी संवाद साधला. पण पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पुन्हा एकदा वाहनातच बसण्याची विनंती केली. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.

- Advertisement -

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन, पोलिसांना बाजूला ठेऊन या, मग जे काही व्हायचे ते होऊ द्या, असे खुले आव्हानच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. ठाण्यात सध्या दिवाळीपूर्वीच आतषबाजी सुरू झाली असून, शहरात काही फुसके बार आले होते जे न वाजताच निघून गेले. दुसरीकडे शिवसैनिकांचे फटाके असे काही वाजले की, त्यांना माघार घ्यावी लागली, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला आहे.

त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत, उभ्या राहात असलेल्या नव्या शाखेचे बांधकाम अवैध असल्याचा दावा केला आहे. मुंब्र्याची शाखा पाडून तिची पुनर्बांधणी दिवसरात्र सुरू आहे. पण ही जागा गुरचरण (गायरान) आहे. पोलिसांना हे माहीत आहे आणि महापालिका कर्मचारी आंधळे झाले असल्याची टीका त्यांनी केली आहे.

गुरचरण जमिनीवर बांधकाम करता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट निकाल आहे. पण अवैध बांधकाम जोरात सुरू आहे, आपण प्लॅन मंजूर करणार का? आपण हे रोखणार की असेच चालू ठेवणार, असे प्रश्न राज्याचे माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना केला आहे. कोर्टात हे सगळे पुरावे सादर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -