घरमहाराष्ट्रतुम्ही आता मुंबईत याच हे आमचं आव्हान, संजय राऊतांची शिंदे समर्थक आमदारांना...

तुम्ही आता मुंबईत याच हे आमचं आव्हान, संजय राऊतांची शिंदे समर्थक आमदारांना धमकी

Subscribe

हम हार मानने वाले नही है, हम जितेंगे, फ्लोअर टेस्टमध्ये जिंकू आणि जर लढाई रस्त्यावर झाली, तर तिकडेसुद्धा जिंकू, ज्यांना आमचा सामना करायचा आहे, ते मुंबईत येऊ शकतात, असं थेट आव्हानच संजय राऊतांनी दिलंय.

मुंबईः हम हार मानने वाले नही है, हम जितेंगे, फ्लोअर टेस्टमध्ये जिंकू आणि जर लढाई रस्त्यावर झाली, तर तिकडेसुद्धा जिंकू, ज्यांना आमचा सामना करायचा आहे, ते मुंबईत येऊ शकतात. आम्ही पूर्ण तयारी केलीय, तुम्ही आता याच हे आमचं आव्हान आहे, असं संजय राऊत म्हणालेत. वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये संजय राऊत, शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि अनिल देसाईंमध्ये बैठक झाली. त्या बैठकीनंतर संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय.

कायदेशीर मार्ग नाही, सर्व प्रकारचे मार्ग अवलंबणार आहोत. यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीनं आणि बाळासाहेब ठाकरे यांचं मी नाव घेऊन सांगतो, त्यांच्या स्मृतींना मी वंदन करून सांगतो, हम हार मानने वाले नही है, हम जितेंगे, फ्लोअर टेस्टमध्ये जिंकू आणि जर लढाई रस्त्यावर झाली, तर तिकडेसुद्धा जिंकू, ज्यांना आमचा सामना करायचा आहे, ते मुंबईत येऊ शकतात, असं थेट आव्हानच संजय राऊतांनी दिलंय.

- Advertisement -

त्यांनी चुकीचं पाऊल उचललं आहे. त्यांना आम्ही पुन्हा संधीसुद्धा दिली. आता मला वाटतं वेळ निघून गेलीय. आम्ही आता बैठक घेतली, शरद पवार, अनिल देसाई होते, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब होते. तिथे मुख्यमंत्र्यांचीसुद्धा बातचीत झाली. आम्ही पूर्ण तयारी केलीय, तुम्ही आता याच हे आमचं आव्हान आहे. याच बिल्डिंगमधून महायुतीची घोषणा झाली, याच बिल्डिंगमधून बंधन बांधण्यात आलं. या बिल्डिंगमधून मी तुम्हाला सांगतोय, महाविकास आघाडी मजबूत आहे. महाविकास आघाडीचं सरकार पुढील अडीच वर्षे पूर्ण करेल आणि पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केलाय.


हेही वाचाः आकडा आणि बहुमत फार चंचल, मुंबईत आल्यावर आमदारांच्या श्रद्धेची खरी कसोटी, संजय राऊतांचा इशारा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -