घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या राजकारणाचे हे चारित्र्य..., संजय राऊत यांचा भाजपावर 'रोखठोक' हल्ला

महाराष्ट्राच्या राजकारणाचे हे चारित्र्य…, संजय राऊत यांचा भाजपावर ‘रोखठोक’ हल्ला

Subscribe

मुंबई : सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या बँक खात्यात गेल्या पाच वर्षांत पाच हजार कोटी जमा झाले व या उदार देणगीदारांचा पत्ता माहीत नाही. महाराष्ट्रात आमदार खरेदीसाठी प्रत्येकी पन्नास कोटींप्रमाणे याच लक्ष्मीचा वापर झाला. एका वरिष्ठ नेत्यांकडे बसलो असताना चर्चेत माहिती मिळाली. सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांचे गट आहेत, त्यांची दिवाळी जोरात आहे. घरपोच एक कोटीचे पॅकेज त्यांना मिळणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे हे चारित्र्य. त्या चारित्र्याची लक्तरे रोज निघत आहेत, असा ‘रोखठोक’ हल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा – पंतप्रधान मोदी सलग दहाव्यांदा सीमेवर साजरी करणार दिवाळी: जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना भेटणार

- Advertisement -

भ्रष्ट मार्गाने जे संपत्ती गोळा करतात तेच आता ‘दयावान’ असल्याचा आव आणतात. हे लोक वर वर धनवान असले तरी, वृत्तीने कमालीचे दरिद्री असतात. एका सत्पुरुषाने सांगितले आहे, “अशा लोकांकडची लक्ष्मी कुत्र्यावर बसलेली असते. त्यामुळे या लक्ष्मीची शक्ती कुत्र्याइतकीच सामान्य असते. ती गजराजाप्रमाणे नसते. त्यामुळे या लक्ष्मीचा उपयोग परोपकार, राष्ट्रीय कार्य यासाठी होत नाही. हीन दर्जाच्या कामात होतो व हीच लक्ष्मी मग ‘पाच हजार कोटीं’च्या रूपात सत्ताधाऱ्यांच्या खात्यात जमा होते, अशी जोरदार टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या ‘रोखठोक’ सदरातून केली आहे.

हेही वाचा – Weather Update: ऐन दिवाळीत अवकाळी! कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पाऊस बरसणार

- Advertisement -

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या बँक खात्यात गेल्या पाच वर्षांत पाच हजार कोटी जमा झाले. आपल्या देशात इतके अज्ञात उदार देणगीदार निर्माण होतात, याचे आश्चर्यच वाटते. पाच हजार कोटी देणारे कोण? त्यांचा तपास करावा, असे देशातील तपास यंत्रणांना वाटत नाही. तटस्थता व चारित्र्याचा ऱ्हास झाल्याचे हे लक्षण, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

पाच राज्यांत निवडणुका आणि महाराष्ट्रात दिवाळीची धामधूम सुरू आहे. निवडणुका विधानसभेच्या, पण फटाके असे फुटत आहेत की, हिंदुस्थानच्या भूमीवर तिसरे जागतिक महायुद्धच सुरू आहे. सत्ता सगळ्यांनाच हवी व सत्ता कोणालाच सोडायची नाही. या पेचात लोकशाही फसली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -