घरमहाराष्ट्र...हेच आरबीआयच्या रिपोर्टचे सार आहे, जितेंद्र आव्हाड यांचा मोदी सरकारवर निशाणा

…हेच आरबीआयच्या रिपोर्टचे सार आहे, जितेंद्र आव्हाड यांचा मोदी सरकारवर निशाणा

Subscribe

मुंबई : भारतातील घरगुती बचत (Household Saving) गेल्या 50 वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे, असे रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) कौटुंबिक मालमत्ता आणि दायित्वांशी संबंधित (RBI data on Household Assets and Liabilities) अहवालातून ही बाब समोर आली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी टिप्पणी केली आहे. महागाईने देशातील सर्वसामान्य जनतेचे कंबरड मोडले आहे, हेच आरबीआयच्या रिपोर्टचे सार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – ये बात… मोहम्मद सिराजच जगात नंबर वन; नामांकित बॉलरलाही टाकले मागे

- Advertisement -

राज्याचे माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आरबीआयच्या या अहवालासंदर्भात ट्वीट केले आहे. आपल्या भारतीय कुटुंब पद्धतीत आर्थिक बचतीला प्रचंड महत्त्व आहे. मुळात आपल्या समाजाची आर्थिक सवयच ती आहे. घरातला कर्ता – कर्ती जे काही कमवून घरी आणतो, त्यातील एक हिस्सा जपून ठेवायचा, जेणेकरून तो आपल्या अडचणीच्या काळात आपल्या मदतीला येईल, अशी मानसिकता असणारी आपण लोक आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

रिझर्व्ह बँकेच्या रिपोर्टनुसार, भारतीय कुटुंबांची बचत करण्याची सवय गेल्या पाच दशकांतील सर्वात खालच्या पातळीवर म्हणजेच 5.1 टक्क्यांवर गेली आहे. जीडीपीच्या दृष्टीने पाहिले तर, भारताची निव्वळ बचत यावर्षी 13.77 लाख कोटी रुपयांवर घसरली आहे. गेल्या 50 वर्षांतील ही नीचांकी पातळी आहे. एक वर्षापूर्वी हे प्रमाण 7.2 टक्के होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Justin Trudeau : वडिलांच्या चुकीची ट्रूडोंकडून पुनरावृत्ती! खलिस्तान मुद्द्यावरून भारत-कॅनडाचा वाद शिगेला

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, 2020-21 च्या तुलनेत 2022-23मध्ये निव्वळ घरगुती मालमत्तेत मोठी घट झाली आहे. 2020-21 या वर्षात निव्वळ देशांतर्गत संपत्ती 22.8 लाख कोटी रुपये होती, जी 2021-22मध्ये झपाट्याने कमी होऊन 16.96 लाख कोटी रुपये झाली. 2022-23मध्ये ती आणखी कमी होऊन 13.76 लाख कोटी रुपयांपर्यंत आली असल्याचे डॉ. आव्हाड यांनी नमूद केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या अहवालावर नजर टाकली तर ‘वेगाने वाढत असणारी महागाई’, हे यामागील प्रमुख कारण आहे, असे दिसते. महागाईने देशातील सर्वसामान्य जनतेचे कंबरड मोडले आहे, हेच खरतर आरबीआयच्या रिपोर्टच सार असल्याची टीका त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -