घरताज्या घडामोडीगंभीर परिस्थितीत भावा-भावाने एकत्र यावं, उद्धव आणि राज यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्याचे साकडे

गंभीर परिस्थितीत भावा-भावाने एकत्र यावं, उद्धव आणि राज यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्याचे साकडे

Subscribe

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. महाविकास आघाडीसमोर सत्तेचा पेच निर्माण झाला असून त्यांना लवकरच बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी व्यक्त केलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. महाविकास आघाडीसमोर सत्तेचा पेच निर्माण झाला असून त्यांना लवकरच बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. (This is the situation where Uddhav Thackeray and Raj Thackeray should come together says ncp leader)

हेही वाचा – एकनाथ शिंदे आज मुंबईत येणार? महाविकास आघाडी सरकारची अग्निपरीक्षा

- Advertisement -

सत्तापेचातून बाहेर पडण्याकरता रुपाली पाटील-ठोंबरे यांनी म्हटलं की, महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामागे कोणाचा दबाव आहे, सत्ता मिळवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे, हे स्पष्ट आहे. पण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस जगवण्यासाठी, त्याच्या विकासासाठी खूप मोठं योगदान दिले आहे. म्हणूनच त्यांच्या दोन्ही लेकरांनी एकत्र येण्याची हीच खरी वेळ आहे. गंभीर परिस्थितीमध्ये भावाने भावासोबत खंबीरपणे उभे राहायला पाहिजे, असे आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना वाटते.


दरम्यान, येत्या एक-दोन दिवसांत एकनाथ शिंदे मुंबईमध्ये परतणार आहेत. मुंबईत आल्यानंतर ते राज्यपालांना पत्र देतील. ३७ बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला असल्याचे हे पत्र असणार आहे. एकनाथ शिंदे यांनी पत्र राज्यपालांना दिल्यास राज्यपाल महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करायला सांगू शकतात. त्यामुळे येत्या एक दोन दिवसात महाराष्ट्रातील सत्तापेचात आणखी नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -