घरताज्या घडामोडीVideo: भोंगा वाजलाय, करोना व्हायरस विरोधात युद्ध सुरु झालंय - मुख्यमंत्री उद्धव...

Video: भोंगा वाजलाय, करोना व्हायरस विरोधात युद्ध सुरु झालंय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Subscribe

करोना व्हायरस देशभरात हातपाय पसरत असला तरी आपण त्याचा सामना करण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. वैद्यकिय सेवा, अन्न धान्याचा पुरवढा आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहे. फक्त राज्य सरकारने जे निर्देश दिले आहेत. ते लोकांनी काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. एवढेच सांगतो की, युद्ध सुरु होण्यापुर्वी जसा भोंगा वाजतो, तसा तो आता वाजलेला आहे आणि करोना व्हायरसच्या विरोधात युद्ध सुरु झालेले आहे. युद्धात ज्याप्रमाणे शिस्तबद्ध तयारी केली जाते, तशी आपण केली आहे. फक्त जनतेने सहकार्य करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State- LIVE

CMOMaharashtra ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಮಾರ್ಚ್ 18, 2020

- Advertisement -

 

हे संकट जात-पात पाहत नाही. युद्धात कुणाचीही जात विचारली जात नाही. त्याप्रमाणे हे संकट माणूस बघून येत नाही. त्यामुळे सर्वांनी हा शिवरायांचा लढणारा महाराष्ट्र आहे, याची जाणीव ठेवावी. सरकार आपल्यापरिने निर्णय घेत आहे. मात्र जनतेने स्वतःहून प्रवास टाळण्याची गरज आहे. चीनने ज्याप्रमाणे वर्क फ्रॉम होम पद्धत सुरु करुन गर्दी टाळली आणि करोनाच्या संकटातून बाहेर पडले. त्याप्रमाणे आपण देखील या संकटातून बाहेर पडू शकतो, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

काय म्हणाले उद्धव ठाकरे आपल्या भाषणात – 

  • आपले वैद्यकिय अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय २४ तास आपल्यासाठी काम करत आहेत. ते २४ तास आपल्यासाठी काम करत असतील तर त्यांच्यासाठी आपण २४ तास घरात राहू शकत नाही का?
  • सर्व धर्मीयांनी आपले मंदिरे बंद केली आहेत. धार्मिक यात्रा, क्रीडा सामने पुढे ढकलली आहेत. तरिही अजून लोकांचा प्रवास बंद झालेला नाही. लोकांनी प्रवास थांबला पाहीजे.
  • करोना विषाणू एक एक पाऊल पुढे टाकत आहे. मात्र अजूनही परिस्थिती ताब्यात आहे.
  • आपल्याकडे जे रुग्ण आहेत, ते सर्वच्या सर्व बाहेरून आलेले आहेत. बाहेरून आलेली लोक देखील आपलीच आहेत. त्यामुळे त्यांना घाबरून चालणार नाही.
  • काहीजणांच्या हातावर स्टॅम्प मारला असूनही ते लोक समाजात वावरत आहेत. हे चुकीचे आहे, कळत नकळत आपण विषाणूचा प्रसार करत आहोत.
  • मी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आज बोललेलो आहे. केंद्र सरकार आपल्याला मदत करायला तयार आहे.
  • चाचणीची सुविधा आपल्याकडे कमी होती, मात्र आतापासून आपण ती वाढवलेली आहे.
  • सरकारकडून ज्या सूचना दिलेल्या आहेत, तेवढ्याच पाळा. इतर कोणत्याही सूचनांवर विश्वास ठेवू नका.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -