मुंबई : पुण्यातील एका उद्योगपीच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेट झाली. या भेटीत अजित पवारांच्या माध्यमातून भाजपने शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्रीपद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “पुण्यातील उद्योगतीच्या निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीदरम्यान शरद पवारांना केंद्रीय कृषी मंत्रीपद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटील देखील उपस्थित होते”, अशी माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी प्रकाशित केली.
अजित पवारांच्या भेटीसंदर्भात शरद पवार म्हणाले…
उद्योगपतीच्या घरी झालेल्या भेटीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, अजित पवार हा माझा पुतण्या आहे. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीनं वडिलमाणसाला भेटण्यात काही गैर नाही. अजित पवार आणि माझी गुप्त बैठक झालेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा – Sharad Pawar : अजित पवारांना…; शरद पवार यांनी सांगितलं भेटीमागचं कारण
भाजपसोबत न जाण्याचा पुनरुच्चार
शरद पवार आणि अजित पवार यांची वारंवार भेट होत असल्यामुळे ते भाजपात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी माझी स्पष्ट भूमिका मांडतो की, आम्ही भाजपसोबत जाणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच लोकांमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असेही त्यांनी सांगितले.