Eco friendly bappa Competition
घर इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा 'आपलं महानगर'तर्फे यंदाही ‘इको-फ्रेंडली बाप्पा' स्पर्धा; सोबत 'सेल्फी विथ बाप्पा' उपक्रम

‘आपलं महानगर’तर्फे यंदाही ‘इको-फ्रेंडली बाप्पा’ स्पर्धा; सोबत ‘सेल्फी विथ बाप्पा’ उपक्रम

Subscribe

मुंबई : गणेशोत्सवाचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती असलेला आपला बाप्पा घराघरांत आणि विविध मंडळांत येण्यासाठी तीनच दिवस शिल्लक आहेत. गणेशोत्सव म्हटले की, गणेशमूर्तीबरोबरच सजावट, रोषणाई, देखावा हे सर्वांचे लक्ष वेधून घेतातच. गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरीसची मूर्ती आणि सजावटीला थर्माकॉल, प्लास्टिक किंवा इतर अविघटनशील साहित्य हमखास वापरले जात होते. मात्र यातून पर्यावरणाचे अपरिमित हानी होते, याबाबत आता जनजागृती होऊ लागल्याने बहुतांश भाविक इको-फ्रेंडली आरास करण्यावर भर देताना दिसतात. विघ्नहर्त्याची मूर्ती देखील आता शाडू, कागदाचा लगदा किंवा अन्य घटकांपासून बनवली जात आहे. हा स्वागतार्ह बदल आहे.

हेही वाचा – रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा… भक्तगणांच्या सुरक्षेसाठी कोट्यवधींचे विमाकवच

- Advertisement -

इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करून पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी हातभार लावणाऱ्या भाविकांसाठी ‘आपलं महानगर’ने दरवर्षीप्रमाणे यंदाही www.mymahanagar.com या वेबसाइटच्या माध्यमातून ‘इको-फ्रेंडली बाप्पा स्पर्धा’ आयोजित केली आहे. पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी काय कराल?

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला फक्त सजावट आणि गणपतीच्या मूर्तीचा फोटोसह गणपतीची मूर्ती कशापासून बनविली आहे, तुमच्याकडील गणेशोत्सव किती दिवसांचा आहे, देखाव्यासाठी काय साहित्य वापरले आहे आणि गणेशोत्सव कधीपासून साजरा करता याची थोडक्यात माहिती पाठवायची आहे. आमचा व्हॉट्सअप क्रमांक 75066 50006 यावर तुम्ही हे फोटो आणि माहिती पाठवू शकता किंवा आम्हाला [email protected] या ईमेल आयडीवर देखील आपली माहिती, फोटो पाठवू शकता. सोबत आपला नाव, पत्ता, संपर्क क्रमांक द्यायला विसरू नका.

- Advertisement -

हेही वाचा – गुणेश तू गणेश तू… बाप्पासाठी पर्यावरणस्नेही मखर अन् आरास

‘सेल्फी विथ बाप्पा’ उपक्रम

याबरोबरच ‘सेल्फी विथ बाप्पा’ हा उपक्रम देखील आहे. याद्वारे तुमच्या घरातील, सार्वजनिक मंडळाच्या गणेशाचे दर्शन ‘आपलं महानगर’ (वृत्तपत्र) आणि My Mahanagar (वेबसाइट)च्या समस्त वाचकांना होईल. शिवाय, तुम्ही पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती आणि घरगुती आरास तसेच स्वत:च्या माहितीसह व्हिडीओ देखील पाठविल्यास ‘My Mahanagar’च्या युट्यूब चॅनलवरूनही तो प्रसारित केला जाईल.

- Advertisment -