Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी; बैठकीत घेण्यात आला 'हा' निर्णय

अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी; बैठकीत घेण्यात आला ‘हा’ निर्णय

Subscribe

यंदा अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी म्हणजे 26 सप्टेंबर रोजी आहे. त्यामुळे यंदा गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणूक मार्गात बदल करण्याचा निर्णय पोलीस आणि प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. हा बदल फक्त यंदासाठीच असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

यंदा अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी म्हणजे 26 सप्टेंबर रोजी आहे. त्यामुळे यंदा गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणूक मार्गात बदल करण्याचा निर्णय पोलीस आणि प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. हा बदल फक्त यंदासाठीच असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. (This year Anant Chaturdashi and Eid e Milad are on the same day Lord Ganesha this year The police have clarified that this change is only for this year )

ईद-ए- मिलादच्या दिवशी खुलताबाद येथील हजरत महंमद पैंगबर रहे यांच्या पवित्र पैराहन ए -मुबारक व मुं -ए मुबारकच्या दर्शनासाठी लाखो मुस्लिम भाविकांची गर्दी होते. त्यामुळे शहरातील सर्व मुख्य रस्ते वाहनांसाठी बंद केले जातात. गणपती मिरवणूक मार्ग असलेल्या रस्त्यावरच सदरील दर्गा असल्यानं यावर्षी खुलताबाद शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

..तर ईदच्या मिरवणुका पुढे ढकलल्या

- Advertisement -

या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही समुदायातील बंधुत्व जोपासण्याच्या उद्देशानं तसंच दोन्ही सण निर्विघ्न आणि शांततेत पार पाडावेत या उद्देशाने ईदच्या मिरवणूका एक दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बुधवारी भायखळा येथील खिलाफत हाऊस येथे मुस्लिम प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीला ज्येष्ठ मौलवी मौलाना मोईन अश्रफ कादरी (मोईन मियॉं) यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या बैठकीत, ईद-ए-मिलाद 28 सप्टेंबरला असली तरीही शांतता आणि सौहार्दाच्या हितासाठी जुलूस एक दिवस पुढे ढकलल्यास कोणताही अडचण येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. बैठकीला माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आरिफ नसीम खान, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नसीम सिद्धीकी उपस्थित होते.

- Advertisement -

(हेही वाचा: नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश )

यंदा अधिक मासामुळे बाप्पाचे आगमन लांबले आहे. बहुतांशवेळा पावसाळ्याच्या उत्तरार्धाच्या प्रारंभीच बाप्पाचं आगमन होतं. यंदा मात्र गणरायाचे आमगन सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजेच पावसाळ्याच्या अगदी शेवटी होणार आहे.

यंदा 19 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. गणेशोत्सवादम्यानही पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असतो. त्यातच आता 28 तारखेला अनंत चतुर्दश आणि त्याच दिवशी ईद-ए-मिलाद आल्यानं पोलिसांवर ताण येणार आहे. दोन्ही सण सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -