यंदा देशात साखरेचे सर्वाधिक उत्पादन, विक्रमी निर्यातीला संधी – शरद पवार

This year, highest sugar production has taken place and there is an opportunity for export, said Sharad Pawar
यावर्षी देशात साखरेचे सर्वाधिक साखरेचे उत्पादन, विक्रमी साखर निर्यातीला संधी - शरद पवार

यावर्षी देशात साखरेचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात आहे. मात्र, यात आनंद न मानता पुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयारी करावी लागेल. तज्ञांच्या अंदाजानुसार यावर्षीपेक्षा पुढील वर्षील उसाचे लागवड क्षेत्र आणखी वाढेल. त्यामुळे उसाच्या तोडणीचे नियोजन लागवडी पासून करावे लागेल, असे खासदार शरद पवार म्हणाले. वसंतदादा शुगर इन्सि्ट्टयूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय साखर परिषदेच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळेस पाणी आणि पाऊस समाधानकारक असणार आहे. त्यामुळे उसाचे उत्पादन आणखी वाढेल. यावेळेस विक्रमी साखर निर्यातीला संधी आहे. यावर्षी भारतातून 121 देशात साखर निर्यात करण्यात आली. असे कधी झाले नव्हते, असे ही पवारांनी म्हटले आहे.

साखर कारखान्याने ऊस विकास योजना राबवण्याची गरज –

राज्यात ऊस वगळून इतर पिकाळा हमीभाव मिलथ नाही. त्यामुळे शेतकरी उसाकडे बळले आहेत. यामध्ये चुकीचे काही नाही. मात्र, ऊस पिकवताना प्रती एकरी उत्पादन वाढवण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक साखर कारखान्याने ऊस विकास योजना राबवण्याची गरज आहे, असे खासदार शरद पवार म्हणाले.

कारखान्याच्या गोडाऊन्सवर सोलर पॅनल बसवण्याची तयारी –

पुढे बोलताना अफगाणिस्तान हा साखरेचा मोठा ग्राहक होता. मात्र, तिथली परिस्थिती बदलल्याने 13 लाख टन साखरेची निर्यात 3 लाख टनावर आली आहे. सौर उर्जेच्या क्षेत्रातील कंपन्यांनी राज्यातील साखर कारखान्यांची गोडाऊन्स आणि बाधकामांवर सोलर पॅनल बसवण्याची तयारी दर्शविली आहे. या कंपन्यांच्या मागणीवर आम्ही विचार करतो आहोत. साखर संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि साखर आयुक्तालयाकडून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरु करणार –

विदर्भात गोसीखुर्द धरण झाले आहे. हे धरण उजणी आणि कोयनेपेक्षा मोठे आहे. त्यामुळे विदर्भात उसाचे क्षेत्र वाढायला हवे. त्यासाठी विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरु करण्याची मागणी नितिन गडकरींनी केली आहे. लवकरच याबाबत काम सुरु केले जाईल, असे शरद पवार म्हणाले. या परिषदेमध्ये खासदार शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री शंभुराजे देसाई, मंत्री विश्वजित कदम, मंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आणि साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर उपस्थित आहेत.