घरउत्तर महाराष्ट्रयंदा, गणपती बाप्पांच्या देखाव्यांत चांद्रयानची भरारी !

यंदा, गणपती बाप्पांच्या देखाव्यांत चांद्रयानची भरारी !

Subscribe

नाशिक : गणेशोत्सवात धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ असलेले देखावे हे बघायला मिळतातच; परंतु यंदा या धार्मिक उत्सवात वैज्ञानिक जागृतीही केली जात असल्याचे लक्षवेधी चित्र नाशिकसह राज्यभर दिसत आहे. यंदा अनेक मंडळांनी चांद्रयान- ३ मोहिमेच्या अनुषंगाने देखावे सादर केले आहेत. चांद्रयान तीन मोहीम भारताने यशस्वी करून दाखवली. संपूर्ण जगभरातून भारतीय शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

भारताचे अंतराळ संशोधन क्षेत्रातील यश आणि प्रगती हे चांद्रयान तीनच्या यशाचे द्योतक आहे. गणेशोत्सवाच्या महिनाभर आधीच भारताने ही मोहिम फत्ते केल्याने तिचे पडसाद गणेशोत्सवात उमटले नसते तर नवल ! यंदा बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी चांद्रयान मोहिमेचे देखावे साकार केले आहेतच; शिवाय अनेकांनी घरगुती आरास देखील चांद्रयान मोहिमेचीच केली आहे. या देखाव्यांमधून भारतीय शास्त्रज्ञांचे कौतूक गणेश भक्तांनी मनापासून केलेले दिसते. देखाव्यांमध्ये काहींनी चंद्रावर अलगदपणे सोनेरी विक्रम लँडर उतरत असल्याचा चलत देखावा सादर केला आहे. तर काहींनी लाकडापासून लँडर तयार करीत चंद्राची पार्श्वभूमी तयार केली आहे.

राज्यभर डंका 

  • कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या वतीने देखाव्यांसाठी चांद्रयान ३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • नाशिक मध्य मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानी चांद्रयान ३ चा देखावा तयार करण्यात आला आहे.
  • अभिनेता सुबोध भावे याच्या घरीही त्याच्या मुलांनी बाप्पासाठी खास ’चांद्रयान ३’ चा देखावा तयार केला आहे.
  • ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर चांद्रयानाचा देखावा साकारण्यात आला आहे.
  • मुंबईतील नरे पार्क येथील राजा परळचा गणपती या गणेशोत्सवात चंद्रयान ३ चा देखावा तयार करण्यात आला आहे.
  • कोल्हापूरच्या शिवाजी पेठेतील मरगाई गल्ली गणेशोत्सव मंडळाच्यावतीने चांद्रयान ३ मोहिमेची माहिती आपल्या वर्गणी पावतीवर छापली आहे.
  • जळगावमधील गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्चच्या विद्यार्थीनींनी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून चांद्रयान ३ चा देखावा तयार केला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -