घरताज्या घडामोडीयंदा मंडळाना देणगी स्वरूपात राजकारण्यांकडून मिळणार 'बाप्पाची मूर्ती'

यंदा मंडळाना देणगी स्वरूपात राजकारण्यांकडून मिळणार ‘बाप्पाची मूर्ती’

Subscribe

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना राजकीय नेते देगणी स्वरूपात बाप्पाची मूर्ती आणि पूजेचे सामान देणार आहेत.

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, दिवसेंदिवस मुंबईसह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहे. त्यातच गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर आला असताना यंदा अनेक मोठ्या मंडळानी गणेशोत्सव साजरा न करता कोरोना महामारीत सरकारला साथ देण्याचा निर्णय घेतला असून, यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा केला जाणार आहे. आधीच लॉकडाऊन त्यात अनेकांच्या गेलेल्या नोकऱ्या यामुळे यावर्षी अनेक मंडळांनी हात आखडता घेतला असून, आता मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना राजकीय नेते देगणी स्वरूपात बाप्पाची मूर्ती आणि पूजेचे सामान देणार आहेत. शिवसेना- भाजपच्या नेत्यानी आपापल्या विभागातील मंडळाना देणगी स्वरूपात बाप्पाची मूर्ती आणि पूजेचे सामान देण्याचा निर्णय घेतला असून, भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल, भाजप नगरसेवक प्रकाश मोरे आणि माजी नगरसेवक ईश्वर तायडे यांनी त्यांच्या विभागात सध्या फलक लावले आहेत. या नेत्यांकडून 2, 3 आणि 4 फुटांपर्यत बाप्पाची मूर्ती आणि पूजेचे समान दिले जाणार आहे.

स्थानिक मूर्तिकार नाराज

दरम्यान इतके दिवस सर्व मूर्तिकार जागेसाठी तडफडत आहेत, जागेविना व्यवसाय सुरू झाला नाही, कित्येकांची कुटुंबे अर्धपोटी आहेत, त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला या लोकप्रतिनिधींना वेळ नाही, पण स्वतःचे मतदार संघ, पक्षाचे हीत जपायला ते त्या मूर्तिकारांच्या पोटावर पाय देऊन स्वार्थाची पोळी भाजत असल्याची टीका मूर्तिकार करू लागले असून, हे रेडिमेड मूर्ती आणणार आणि मोफत देणार. यांचं बघून दुसरे पक्ष ही असेच करणार. पूर्ण मुंबईत अश्या तऱ्हेने मोफत रेडिमेड मुर्त्या राजकीय पक्षांनी पुरवल्या तर स्थानिक खऱ्या मूर्तीकारांनी काय करायचे? असा सवाल मूर्तीकार मनोहर बागवे यांनी उपस्थित केला. शासनाला, महापालिकेला फक्त उत्सव साजरा कसा करायचा याचीच पडली आहे पण स्थानिक मूर्तिकारांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, नाहीतरी पूर्वीपासून एकमेव दुर्लक्षित कलाकार म्हणजे मूर्तिकार! आता तरी मूर्तीकारांनी जागे होऊन याला विरोध करायला हवा. मूर्तिकारांच्या जेवढ्या संघटना आहेत त्यांनी यावर आवाज उठवायला हवा असे बागवे यावेळी म्हणालेत.

- Advertisement -

हेही वाचा – नगर जिल्ह्यातील आमदाराला कोरोनाची लागण


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -