घरताज्या घडामोडीयंदा देवीच्या विसर्जनाच्या चित्रीकरणावर पोलिसांकडून मनाई

यंदा देवीच्या विसर्जनाच्या चित्रीकरणावर पोलिसांकडून मनाई

Subscribe

नवरात्रोत्सवाचा अखेरचा दिवस म्हणजे विजयादशमी. यश दिवशी अनेक सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातील देवींचे विसर्जन केले जाते. मात्र, विसर्जनावेळी अनेकांकडून त्याचे चित्रीकरण केले जाते.6

नवरात्रोत्सवाचा अखेरचा दिवस म्हणजे विजयादशमी. यश दिवशी अनेक सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातील देवींचे विसर्जन केले जाते. मात्र, विसर्जनावेळी अनेकांकडून त्याचे चित्रीकरण केले जाते. मात्र, यंदा देवीच्या विसर्जनावेळी त्याचे चित्रीकरण करण्यास बंदी असणार आहे. याबाबत राज्याचे उप. पोलिस आयुक्त संजय लाटकर यांनी माहिती दिली आहे. (This year the filming of the immersion of the goddess has been prohibited by the police)

नवरात्रोत्सवानंतर 5 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत देवीचे विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जनावेळी बऱ्याचदा देवीच्या अर्ध विसर्जित मूर्ती समुद्र किनाऱ्यावर तरंगताना दिसतात. त्यावेळी त्याचे अनेकजण चित्रीकरण करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. त्यानंतर अनेकजण विटंबनेचा मुद्दा उपस्थित करत, कमेंट्स करत असतात. त्यामुळे अनेकांच्या सामाजिक भावना दुखावतात. परिणामी पोलिसांनी यावर तोडगा म्हणून अर्ध विसर्जित मूर्तीच्या चित्रीकरणावर बंदी घातली आहे.

- Advertisement -

यंदा नवरात्रोत्सवाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. कारण कोरोनाच्या 2 वर्षांच्या काळानंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात उत्सव साजरे होत आहे. त्यामुळे तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत आहे. यासह थंडावलेल्या बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. यंदा गरबा, दांडियाचे आयोजन मोठ्या स्वरूपात करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त उंच देवीच्या मूर्तीचे सार्वजनिक मंडळात आगमन झाले आहे.


हेही वाचा – संजय राऊतांचा दसराही कोठडीत! जामिनावरील पुढील सुनावणी 10 ऑक्टोबर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -