घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रयंदाची अक्षय्य तृतीया खास; ५० वर्षांनी असा योग !

यंदाची अक्षय्य तृतीया खास; ५० वर्षांनी असा योग !

Subscribe

चंद्र, गुरू, शनी, शुक्र असे चार ग्रह अनुकूल स्थितीमध्ये असणे हा दुर्मिळ योग : ज्योतिषशास्त्र तज्ञ

नाशिक : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. विवाह, गृहप्रवेश,उद्घाटन, भूमिपूजन, लोकार्पण यांसारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवशी येणारा हा सण यंदा मंगळवारी (दि. ३) साजरा केला जाणार आहे. यादिवशी सकाळी ०५.१९पासून अक्षय तृतीया सुरू होणार असून ४ मे रोजी सकाळी ०७.३३ पर्यंत मुहूर्त रहाणार आहे. पौराणिक कथेनुसार या दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले. भगवान परशुरामाचा अवतारही याच दिवशी झाला.

अक्षय्यतृतीयेच्या दिवशी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातात. या दिवशी गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. विशेषतः या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेले कार्य कायम राहते, त्याचा कधीही क्षय होत नाही अशी मान्यता आहे. यंदा अक्षय्य तृतीया रोहिणी नक्षत्र, शोभन योग, तैतिल करण आणि वृषभ राशीतील चंद्रासोबत येत आहे. मंगळवार आणि रोहिणी नक्षत्रामुळे या दिवशी मंगळ रोहिणी योग तयार होत आहे. शोभन योगामुळे या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. याशिवाय पाच दशकानंतर ग्रहांचे विशेष योग यंदा तयार होत आहेत. त्यामुळेच यंदाची अक्षय्य तृतीया खास आहे. यादिवशी संपत्ती आणि समृद्धी कारक शुक्रग्रह आणि कार्यसिद्धी देणारा चंद्र ग्रह आपल्या उच्च राशीत असणार आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या मते हा एक अत्यंत शुभ दुर्मिळ योग आहे. चंद्र शुक्राच्या उच्चतेच्या प्रभावामुळे अक्षय्य तृतीयेला केलेली सर्व शुभ कार्ये अनेक पटींनी शुभ परिणाम देतील. शिवाय या दिवशी सोने, दागिने, वाहन किंवा कोणतीही नवीन वस्तू खरेदी केल्याने जीवनात संपत्ती आणि समृद्धी वाढण्याची शक्यता वाढते अशी मान्यता आहे.

- Advertisement -

या दिवशी घडणाऱ्या विशेष घटना 

या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद मंदिराचे दरवाजे उघडले जातात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. नर-नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता, परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जात असल्याने या दिवशी परशुरामाचे पूजन केले जाते. वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्षभर ते वस्त्रांनी झाकलेले असते. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे. कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, ‘या तिथीस केलेले दान व हवनाचा क्षय होत नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. – देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते’. या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -