घरCORONA UPDATEविनामास्क फिरणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये पाठवा - उच्च न्यायालय

विनामास्क फिरणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये पाठवा – उच्च न्यायालय

Subscribe

सरकारने वेळोवेळी आदेश देऊनही लोकांना त्याचा काही फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारकडून लोकांना संसर्क टाळण्यासाठी मास्क घालणे, हात धुणे, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आज देशात कोरोनाचा संसर्क कमी झाला असला तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे आजही सरकारकडून कोरोनासंबंधीत नियम पाळण्याचे आव्हान केले जात आहे. परंतु लोकांकडून त्या नियमांचे पालन होत नाही असे दिसून येत आहे. सरकारने वेळोवेळी आदेश देऊनही लोकांना त्याचा काही फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे. उच्च न्यायलयाकडून मास्क न घालणाऱ्यां लोकांवर सरकारला कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोना संसर्क रोखण्यासाठी जे नियम सरकारने आखून दिले आहेत. त्या नियमांचे पालन न करणाऱ्यांना थेट कोविड सेंटरमध्ये सेवा करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत, असे निर्देश गुजरात उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
विशाल अवतणी यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती जे.बी.पर्दीवाला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता मास्क न लावताच फिरत असाल तर कोविड सेंटरमध्ये सेवा करण्यासाठी पाठविण्यात येईल. सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांना कमीत पाच आणि जास्तीत जास्त १५ दिवस कोणत्याही कोविड सेंटरमध्ये सेवा करण्यासाठी पाठविण्यात यावे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

- Advertisement -

कोविड सेंटरमध्ये स्वच्छता करणे,रूग्णांसाठी जेवण तयार करणे,रूग्णांची मदत करणे, सेवा करणे, कोविड केद्रांतील इतर कामे करणे, त्याचबरोबर माहिती संकलित करण्याची कामे कोविड सेंटरमध्ये करून घेतली जाणार आहेत. मात्र ही कामे व्यक्तीचे वय,पात्रत,लिंग यानुसार ठरविण्यात येणार आहेत. या शिक्षेचा कार्य अहवाल २४ डिसेंबर पर्यंत सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.


हेही वाचा – तीन महिन्यानंतर शौविक चक्रवतीला जामीन मंजूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -