घरमहाराष्ट्रसभेत घोषणा करणाऱ्यांनी बाळासाहेबांचा वारसा सांगू नये, नरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

सभेत घोषणा करणाऱ्यांनी बाळासाहेबांचा वारसा सांगू नये, नरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Subscribe

ठाणे : आज राम नवमी निमित्त शुभेच्छाचे बॅनर शहरात लावून शिवसेनेने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. लाचारांचा नाही, इथे विचारांचा मान, भगवे आमचे रक्त आणि प्राण आमुचे श्री राम….अशा शब्दात शिवसेनेने शहरात बॅनर लावून रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार सोडून सत्तेत येण्यासाठी काही जणांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ दिली. हे लोक फक्त बेगडी हिंदुत्व दाखवू शकतो ते कृतीत आणू शकत नाही शकत नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार सोडलेल्या लोकांना आम्ही बाण मारला, असा टोला शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

राहुल गांधींनी सत्तेत येण्यासाठी देशात आणि परदेशात वीर सावरकरांचा अपमान केला आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीसोबत उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार सोडून त्यांना साथ देत आहेत, असे नकेश म्हस्के म्हणाले. त्यांनी सांगितले की, मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांविरोधात विधान केले होते, तेव्हा बाळासाहेबांनी स्वत: रस्त्यावर उतरून जोडे मारो आंदोलन केले होते. परंतु उद्धव ठाकरे फक्त सभेत घोषणा देऊन बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी रस्त्यावर उतरून राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारले पाहिजेत. पण हे त्यांना शक्य नाही कारण त्यांनी बेगडी हिंदुत्व स्विकारले आहे, असे नरेश म्हस्के म्हणाले.

- Advertisement -

म्हस्केंनी उद्धव ठाकरेंना आवाहन केले की, तुम्ही बाळासाहेबांचा मुलगा आणि त्यांचा वारसा सांगण्याचा नेहमी प्रयत्न करता. पण जर तुमच्या हिंमत असेल तर सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्या राहुल गांधींना माफी मागायला सांगा, नाहीतर त्यांच्यासोबतची आघाडी तोडा. जर तुम्ही हे केले तरच तुम्ही बाळासाहेबांचे सुपुत्र शोभाल, असेही नरेश म्हस्के म्हणाले.

शरद पवारांमुळे काँग्रेस-ठाकरे गट एकत्र
राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मालेगावच्या सभेत राहुल गांधींना इशारा दिला होता. त्यांनी म्हटले की, सावरकर हे आमचे दैवत असून त्यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही. त्यानंतर संजय राऊत यांनी सावरकर प्रकरणी काँग्रेसच्या वरिष्ठांशी संवाद साधला. दोन दिवसांपूर्वीच मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी महाविकास आघाडीची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर यांच्या भूमिका वेगळ्या असल्यामुळे त्यांना माफीवीर म्हणणे योग्य नाही, अशी ठाम भूमिका मांडली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकाअर्जून खर्गे यांनी पवारांच्या मताला दुजोरा दिला. त्यामुळे काँग्रेसने एक पाऊल मागे येत सावरकरांबाबत आपली भूमिका मवाळ करण्यास सहमती दर्शविली. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा निर्माण होईल असे वाटत ते पुन्हा एकत्र आले आहेत. मात्र सावकरांचा सातत्याने होणार अपमान पाहता भाजपा-शिवसेनेकडून राज्यात लवकरच वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -