घर महाराष्ट्र ज्यांची चौकशी सुरू, तेच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार; प्रकाश आंबेडकर यांचा ‘मविआ’ नेत्यांवर हल्लाबोल

ज्यांची चौकशी सुरू, तेच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार; प्रकाश आंबेडकर यांचा ‘मविआ’ नेत्यांवर हल्लाबोल

Subscribe

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उत्साही कार्यकर्त्यांकडून भावी मुख्यमंत्री अशी बॅनरबाजीही करण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हल्लाबोल केला आहे. ते सोमवारी (5 जून) अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते. (Those who are under investigation are the contenders for the post of Chief Minister, Prakash Ambedkar’s attack on ‘Mavia’ leaders)

प्रकाश आंबेडकर म्हणाले की,  “बापात बाप नाही आणि लेकात लेक नाही”, अशी परिस्थिती महाविकास आघाडीची आहे. “उगाच जागा वाटपाचं घोंगड भिजत ठेवून आघाडीतील तिन्ही पक्ष मुख्यमंत्री आमचाच, यावर जास्त भर देत आहेत. त्या पद्धतीचा एक छुपा गेम सुरू आहे. सध्या ज्या-ज्या लोकांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दिसून येत आहेत, त्यांच्यावर कोणती ना कोणती चौकशी सुरू असणारे चेहरे मुख्यमंत्रीच्या शर्यतीत आहेत आणि तेच दावे करत आहेत, असा टोलाही आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला.

- Advertisement -

भाजपा-शिंदे गटला एकत्र निवडणुका लढण्याशिवाय पर्याय नाही
भाजप आणि शिवसेनेला (शिंदे गट) एकत्र निवडणुका लढवण्याशिवाय पर्याय नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपशी केलेली युती तोडून उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही आमदारांनी बंडखोरी केल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्याच वादामुळे भाजपा आणि शिवेसना (शिंदे गट) येणाऱ्या निवडणुका एकत्रच लढणार, असे मतही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

शेगाव दंगलीप्रकरणी पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नगरमधील शेवगाव शहरात झालेल्या धार्मिक दंगलीच्या अनुषंगाने पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यातील नेते प्रा. किसन चव्हाण यांनी दंगवलीच्या वेळी छत्रपती संभाजीनगर असल्याचा पुरावा देऊनही त्यांना आरोपी केले. याबाबत तक्रार आंबेडकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे करत दंगलीची सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.

- Advertisement -

प्रेम प्रकरणाला लवजिहाद नाव देणे योग्य नाही
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रातील जवळपास 35 हजार महिला गायब झाल्या आहेत. अशावेशी लव जिहादचे नाव पुढे करत राजकारण सुरू आहे. परंतु या प्रकरणी लवजिहादचे नाव देणे हे योग्य ठरणार नाही. प्रेम प्रकरण ही वयक्तिक बाब आहे. ती दोन्हीही धर्माच्या बाजूने होत असते, अशी भूमिका प्रकाश आंबेडर यांनी मांडली.

- Advertisment -