घरमहाराष्ट्रज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्व, विचारधारा सोडली, ते आम्हाला देशद्रोही म्हणतात; एकनाथ शिंदे ठाकरेंवर...

ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्व, विचारधारा सोडली, ते आम्हाला देशद्रोही म्हणतात; एकनाथ शिंदे ठाकरेंवर गरजले

Subscribe

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत ठाकरे सरकार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. आमच्या नेत्यांच्या विरोधात काम झाले. शिवसेनेच्या विरोधात काम केले गेले. जनतेत प्रचंड रोष आहे. निवडणुका होत राहतात, पण तुम्ही पक्षातील लोकांशी गैरवर्तन करता तेव्हा तुमच्याकडे कोण येणार? आता ते लोक आम्हाला देशद्रोही म्हणतात, तुम्ही खुर्चीसाठी हिंदुत्व सोडले होते. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेबांच्या विचारसरणीचा त्याग केला होता. मग देशद्रोही कोण? असा सवाल करत हिंदुत्व आणि बाळासाहेबांची विचारधारा आम्ही पुढे नेते आहोत असही शिंदे म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

शिंदे म्हणाले की, जेव्हा शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले, तेव्हा आमचा या निर्णयाला पाठिंबा नव्हता. आमच्या पक्षाच्या नेत्याने हा निर्णय घेतला तेव्हा आम्ही तो आदेश म्हणून स्वीकारला, पण त्या निर्णयावर कोणीही खूश नव्हते. शिवसेनेत मी सर्वांचे ऐकत होतो आणि आमच्या नेत्यांना वेळ नाही. अनेक लोक माझ्या संपर्कात आले आणि मी त्यांना मदत केली.

- Advertisement -

कोण देशद्रोही, कोण खुद्दार, जनतेला सर्व काही माहित?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे जनतेला माहीत आहे, लोकांनी तुम्हाला नाकारले. कोणी बरोबर केले आणि कोणी चूक केले हे सर्वांना माहीत आहे. मी फक्त देणारा आहे, घेणारा नाही. मी कोणाकडून पैसे घेतले आहेत असे कोणीही म्हणू शकत नाही. वेळ आल्यावर एक एक करून बोलेन. माझ्यापेक्षा जास्त हिशोब कोणाकडे असेल? अशा शब्दात त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे.


हेही वाचा : टेरर फंडिंगप्रकरणी ED, NIA ची मुंबई, पुण्यातही छापेमारी; 20 जणांना अटक


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -