ज्यांची दुकानं बंद होतात ते एकत्र येऊन मोदींवर टीका करताहेत; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

'ज्यांची दुकानं बंद होत आहेत, ते सर्व विरोधक एकत्र येऊन पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत. पण हे कितीही एकत्र आले तरी काहीही परिणाम होणार नाही', असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या एकत्र येण्यावर हल्लाबोल केला.

‘ज्यांची दुकानं बंद होत आहेत, ते सर्व विरोधक एकत्र येऊन पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत. पण हे कितीही एकत्र आले तरी काहीही परिणाम होणार नाही’, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या एकत्र येण्यावर हल्लाबोल केला. सोलापुरातील भाजपा सोलापूर शहर व ग्रामीण जिल्हा संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलनात भाष्य करताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला. (Those whose shops are closed come together to criticized pm narendra Modi devendra Fadnavis attacked opponents)

केंद्रातील मोदी सरकार पाडण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येत असून, रणनिती आखत आहेत. अनेक विरोधी पक्षप्रमुख दुसऱ्या पक्षातील प्रमुखांची भेट घेत आहेत. नुकताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली. शिवाय देशभरातील विरोधकांची ते भेट घेणार आहेत. मात्र विरोधकांच्या एकत्रित येण्यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

नेमके काय म्हणाले फडणवीस?

“सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे विरोधकांचे राजकारण होतं. हेच राजकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोडीत काढलं आणि सामाजिक, आर्थिक परिवर्तनाची लढाई ही देशाचे पंतप्रधान म्हणून लढली जाऊ शकते, तसेच, सामान्यांच्या जीवनात बदल घडवला जाऊ शकतो. हे गेल्या नऊ वर्षांमध्ये मोदींनी दाखवून दिले. त्यामुळे ज्यांची दुकानं बंद होत आहेत, ते सर्व विरोधक एकत्र येऊन पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत”, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

लोकसभा असो किंवा विधानसभा जनता भाजपालाच समर्थन देणार

“पण हे कितीही एकत्र आले तरी काहीही परिणाम होणार नाही. या लोकांनी 2019 मध्ये करून पाहिलं. वेगवेगळ्या राज्यांमध्ये करून पाहिलं. पण जनता मोदी आणि भाजपाच्या पाठीशी आहे. त्यामुळे लोकसभा असो किंवा विधानसभा जनता भाजपालाच समर्थन देणार आहे”, असा विश्वासही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

75 हजार घरं, 75 वर्षांनंतरही पाण्यापासून वंचित

“मी आज प्रधानमंत्री आवास योजना आणि हर घर नल योजनेचा आढावा घेतला. त्यावेळी 70 ते 75 वर्षांनंतर सर्वसामान्य माणसांचा विचार करणारे सरकार आले, असे वाटले. हर घल नल योजनेच्या माध्यमातून 75 हजार लोकांच्या घरी जल पोहोचत आहे. म्हणजे ही 75 हजार घरं, 75 वर्षांनंतरही पाण्यापासून वंचित होते. या सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्याकडे पाणी नव्हते. मात्र त्यांच्यापर्यंत आता पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून पाणी पोहोचत आहे. त्यामुळे परिवर्तन हे मुठभर लोकांचे नाही तर, सर्वसामान्यांचे व्हायला पाहिजे या विचारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – मोठी बातमी! मुंबईतील झोपडपट्टीधारकांना मिळणार 2.5 लाखांत घर; फडणवीसांची घोषणा