घरCORONA UPDATECorona : सौम्य लक्षणे असलेल्यांना आता हॉस्पिटलमध्ये बेड नाही

Corona : सौम्य लक्षणे असलेल्यांना आता हॉस्पिटलमध्ये बेड नाही

Subscribe

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज साधारण २० ते २४ हजार नवीन कोरोना रुग्ण आढळत असून यातील गंभीर रुग्णांना कोरोना रुग्णालयात उपचारासाठी बेड मिळणे कठिण झाले आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना यापुढे उपचारासाठी ‘कोरोना केअर सेंटर’ (सीसीसी) मध्ये किंवा घरीच उपचाराखाली ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने जारी केला आहे. सौम्य कोरोना रुग्णांना यापुढे करोना रुग्णांसाठीच्या रुग्णालयात (डिसीजन) बेड न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र काल नव्या २१ हजार ९०७ रुग्णांचे निदान झाले आहे. तर २३ हजार ५०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत बरे होऊन गेलेल्या रुग्णांचा हा सर्वाधिक आकडा असल्याचे सांगितले जात आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८ लाख ५७ हजार ९३३ वर पोहोचली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७२.२२ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ४२५ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ३२ हजार २१६ इतकी झाली आहे.

- Advertisement -

कोरोना रुग्ण आणि रुग्णालयातील बेड यांच्यात तफावत असून कोरोना रुग्णांसाठी शासकीय तसेच आरोग्य विभागाच्या रुग्णालयातही बेड मिळणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने संबंधितांची बैठक घेऊन सौम्य लक्षणे असलेले कोरोना रुग्ण पन्नाशीच्या आतील असतील तसेच कोमॉर्बीड म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार नसतील तर त्यांना घरीच क्वारंटाइन करावे किंवा करोना उपचार केंद्रात दाखल करावे असा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आदेश जारी केले आहेत.

हेही वाचा –

Corona Update: देशात २४ तासांत १,१३३ रुग्णांचा मृत्यू, कोरोनाग्रस्तांची संख्या ५४ लाख पार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -