कोविड 19 शी संबंधित डेटा लीक झाल्याचा हजारो भारतीयांचा दावा, सरकारकडून इन्कार, चौकशी होणार

या संदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाला पाठवलेल्या ईमेल प्रश्नाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रेड फोरमवर शेअर केलेला नमुना दस्तऐवज दाखवतो की, लीक झालेला डेटा कोविन पोर्टलवर अपलोड करायचा होता. कोविड 19 साथीच्या आजाराबद्दल आणि लसीकरण कार्यक्रमाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने सरकारने डिजिटल तंत्रज्ञानावर खूप अवलंबून आहे.

Now 4 digit security code, booking for vaccine, appointment will be easy on CoWIN app

नवी दिल्लीः भारतातील हजारो लोकांचा वैयक्तिक डेटा सरकारी सर्व्हरवरून लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. यामध्ये त्यांचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता आणि कोविड चाचणी निकालाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑनलाइन सर्चद्वारे ही माहिती मिळू शकते, असे सांगितले जात आहे. लीक झालेला डेटा रेड फोरमच्या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलाय, जिथे सायबर गुन्हेगार 20,000 हून अधिक लोकांचा वैयक्तिक डेटा असल्याचा दावा करत आहे. रेड फोरमवर टाकलेल्या डेटामध्ये लोकांचे नाव, वय, लिंग, मोबाइल नंबर, पत्ता, तारीख आणि कोविड 19 अहवालाची माहिती देण्यात आलीय.

CDN द्वारे सार्वजनिक केली माहिती

सायबर सुरक्षा संशोधक राजशेखर राजहरिया यांनी देखील ट्विट केले आहे की, वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती (PII) नावे आणि COVID-19 परिणामांसह CDN द्वारे सार्वजनिक केली गेलीत. Google ने प्रभावित सिस्टममधील लाखो डेटा सार्वजनिक केला. PII मध्ये COVID-19 चे नाव, MOB, PAN, पत्ता इत्यादी RTPCR निकाल आणि कोविन डेटा असतो आणि हे सर्व सरकारी CDN द्वारे सार्वजनिक केले जात आहेत. Google ने सुमारे 9 लाख सार्वजनिक/खासगी सरकारी दस्तऐवज सर्च इंजिनमध्ये ठेवले आहेत.

कोविन पोर्टलवर डेटा अपलोड केला जाणार होता

या संदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाला पाठवलेल्या ईमेल प्रश्नाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रेड फोरमवर शेअर केलेला नमुना दस्तऐवज दाखवतो की, लीक झालेला डेटा कोविन पोर्टलवर अपलोड करायचा होता. कोविड 19 साथीच्या आजाराबद्दल आणि लसीकरण कार्यक्रमाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने सरकारने डिजिटल तंत्रज्ञानावर खूप अवलंबून आहे. अनेक सरकारी विभाग लोकांना कोविड 19 संबंधित सेवा आणि माहितीसाठी आरोग्य सेतू अॅप वापरण्यास भाग पाडतात.

सरकारने लीकच्या वृत्ताचे खंडन केले

सरकारने सांगितले की, कोविन पोर्टलमध्ये संग्रहित डेटा ऑनलाईन लीक झाल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आलाय. कोविन पोर्टलवरून कोणताही डेटा लीक झालेला नाही आणि लोकांचा संपूर्ण डेटा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आलेय. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय या बातमीची चौकशी करेल, प्रथमदर्शनी हा दावा बरोबर नाही, कारण कोविन ना एखाद्या व्यक्तीचा पत्ता किंवा RT-PCR चाचणीचा निकाल गोळा करत आहेत. त्याच वेळी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले की, कोविन यांच्याकडून डेटा लीकसंदर्भात आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. कथित डेटा लीकचा कोविनशी संबंध नाही, कारण आम्ही लाभार्थ्यांच्या पत्त्याबद्दल किंवा COVID-19 स्थितीबद्दल कोणतीही माहिती गोळा करीत नाही.


हेही वाचाः Goa Election : उत्पल पर्रिकरांची पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा, भाजपला मोठा धक्का