सावध राहा रुपेश! वसंत मोरेंच्या मुलाला धमकीचं पत्र

लोकांच्या प्रश्नासाठी वसंत मोरे प्रशासन आणि अनेकांशी वैर घेतात. यामुळेच वसंत मोरेंच्या मुलाला धमकीचे पत्र मिळाले असावे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्यापासून वसंत मोरे चर्चेत आहेत.

threat to Vasant More's son rupesh threaten Be careful Rupesh
सावध राहा रुपेश! वसंत मोरेंच्या मुलाला धमकीचं पत्र

पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचं पत्र मिळाले आहे. सावध राहा रुपेश असा संदेश या पत्रातून देण्यात आला आहे. वसंत मोरे सध्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत असतात. पुण्यात वसंत मोरेंची कामाची शैली आक्रमक आहे. तसेच अनेक कामात ते सक्रिय असतात यामध्ये वसंत मोरे अनेकवेळा आंदोलन करतात. लोकांच्या प्रश्नासाठी वसंत मोरे प्रशासन आणि अनेकांशी वैर घेतात. यामुळेच वसंत मोरेंच्या मुलाला धमकीचे पत्र मिळाले असावे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्यापासून वसंत मोरे चर्चेत आहेत.

पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. वसंत मोरे मनसेमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहते. तसेच त्यांनी पुण्यातील काही मनसैनिकांवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. परंतु नागरिकांच्या मदतीला दिवस-रात्र न बघता वसंत मोरे जातात. गुरुवारी वसंत मोरेंच्याच मुलाला धमकीचे पत्र मिळाले आहे. याबाबतची माहिती वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमधून दिली आहे.

त्याचा बाप वसंत मोरे हे लक्षात ठेव

मनसे नेते वसंत मोरे यांनी मुलाला धमकीचं पत्र मिळाले असल्याची माहिती दिली आहे. वसंत मोरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मुलगा म्हंटले की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हंटले की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो. आमचेही अगदी तसंच आहे, पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही. राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही. गेले दोन तीन दिवस झालं बोलू की नको तेच समजत नव्हते, पण आज ठरवले तुमच्या सोबत बोललच पाहिजे. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणि त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली, त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती त्या दरम्यान कोणी तरी त्याच्या गाडीच्या वायफर मध्ये “सावध रहा रुपेश” आशी चिट्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर पाहिली. तसा तो कोणाच्या आध्यात मध्यात नसतो तरीही असे का? हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय.

आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबा बाबतीत असा विचार करायचा ? हे का तेच कळत नाही. भारती विद्यापीठ पोलीस बाकी तपास करत आहेत. तू जो कोणी असशील तो पुसट असा कॅमेऱ्यात दिसतोय. बाबा फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे. असे वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.


हेही वाचा : संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय, मात्र मुसळधार पावसाला केव्हा होणार सुरुवात?