घरमहाराष्ट्रसंजय राऊत यांच्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना धमकीचा मेसेज

संजय राऊत यांच्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना धमकीचा मेसेज

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना देखील धमकीचा मेसेज आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत स्वतः अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्वीटरवरून माहिती दिली आहे. या घटनेबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना धमकी मिळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना दोन दिवसांपूर्वी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तर आता लगेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना देखील धमकीचा मेसेज आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत स्वतः अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्वीटरवरून माहिती दिली आहे. या घटनेबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल केली आहे.

राज ठाकरे साहेबांवर बोलताना जरा सांभाळून बोल, अन्यथा तुझा करेक्ट कार्यक्रम होणारच, असा धमकीचा मेसेज अमोल मिटकरी यांना आला आहे. धमकीचा मेसेज मिळताच मिटकरी यांनी अकोला येथील सिविल लाईन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत माहिती दिली की, “मत नसलेल्या सेनेच्या एका टुकार कार्यकर्त्याने आज मला करेक्ट कार्यक्रम करण्याची धमकी दिली.राज्यातील जात्यांध परिस्थिती पाहता सुरक्षेच्या दृष्टीने मी सिविल लाईन पो. स्टेशन अकोला या ठिकाणी तक्रार गुन्हा दाखल झाला आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis आरोपीस तात्काळ अटक करावी हि विनंती”

- Advertisement -

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. त्यांनी आजपर्यंत अनेकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे असा निशाणा साधला आहे. नुकतेच त्यांनी राज ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य केले होते. त्याच गोष्टीमुळे मिटकरी यांना हा मेसेज आल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना पहिल्यांदाच धमकीचा मेसेज आला आहे. पण याआधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्घव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा याआधी धमकी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत राजकीय व्यक्तीला धमकी देण्याची ही सलग तिसरी घटना आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. तर संजय राऊत यांना थेट लॉरेन्स बिश्नोई गँगकडूनच जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.

तसेच मागील महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज येथे पहाटेच्यावेळी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत कारवाई केली होती.


हेही वाचा – भाजप-शिवसेनेकडून आजपासून राज्यात सावरकर गौरव यात्रेला सुरुवात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -