घरमहाराष्ट्रविरोधी पक्षनेते नेते विजय वडेट्टीवारांना कोण देतंय धमकी? सुरक्षेत वाढ करण्याची मागणी

विरोधी पक्षनेते नेते विजय वडेट्टीवारांना कोण देतंय धमकी? सुरक्षेत वाढ करण्याची मागणी

Subscribe

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना त्यांच्या फोनवर धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर वडेट्टीवारांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी केली आहे.

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना त्यांच्या फोनवर धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर वडेट्टीवारांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी केली आहे. परंतु, वडेट्टीवार यांना नेमकी धमकी कोणाकडून देण्यात येत आहे, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. सध्या विजय वडेट्टीवार यांना वाय प्लस सुरक्षा असून त्यात तीन जवान आणि एक गाडी अशी सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र, वडेट्टीवार यांना आलेल्या धमकीमुळे आता या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. (Threatening phone call to Leader of Opposition leader Vijay Wadettiwar, demand for increase in security)

हेही वाचा –फोल आश्वासने देऊन गेले शेठजी…, दीपोत्सवाच्या काळ्या बाजूवरून दानवेंचा मोदी सरकारवर निशाणा

- Advertisement -

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. परंतु, मराठा आरक्षणासंदर्भातील राजकारण तापलेले आहे. सध्या राज्यात मराठा वि. ओबीसी असा नवा वाद निर्माण झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता त्यांना EWS मधून आरक्षण देण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे. तर ओबीसींनी EWS मधून आरक्षण घेऊन त्यांचे आरक्षण आम्हाला द्यावे, असे जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर थेट मराठा आरक्षणाला विरोधच केला आहे. त्यामुळे याच प्रकरणामुळे वडेट्टीवार यांना धमकी तर देण्यात येत नाहीये ना? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे.

मनोज जरांगे यांना EWS मधील 10 टक्के आरक्षणातून होणाऱ्या फायद्यापेक्षा ओबीसीमधून काही टक्के मिळणारा राजकीय फायदा हवा आहे. जरांगेंची इतर कोणत्याही फायद्यापेक्षा राजकीय फायदा होण्याची अधिक मनीषा आहे. यामुळे मराठा समाजाच्या तरुणांचे भले होणार नाही, पण तरी ते आग्रही असल्याचा थेट आरोप विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आला होता. ज्यानंतर त्यांच्या या आरोपांना स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उत्तर देण्यात आले होते. मी हे राजकारणासाठी करत आहे, असे एकही मराठा किंवा ओबीसी म्हणू शकत नाही. तुम्ही सोडलात तर. तुमच्या मनात मराठ्यांविषयी माया नाही. केवळ द्वेष भरलेला आहे. मराठ्यांना सल्ले विजय वडेट्टीवारांनी तरी देऊ नये, असे प्रत्युत्तर जरांगे यांच्याकडून वडेट्टीवारांना देण्यात आले होते.

- Advertisement -

त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या वक्तव्यांमुळेच मराठा आंदोलकांकडून वडेट्टीवारांना या धमक्या देण्यात येत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मोबाईलवर धमकी दिल्याची माहिती स्वतः विजय वडेट्टीवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेत्यानेच याबाबतची माहिती दिल्याने सरकार याकडे गांभीर्याने पाहात काही कारवाई करते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -