घरताज्या घडामोडीयामुळे साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या पत्नी प्रतिभा यांना धमकीचा फोन

यामुळे साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या पत्नी प्रतिभा यांना धमकीचा फोन

Subscribe

साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या पत्नी प्रतिभा नेमाडे यांना शिवीगाळ आणि धमकी देणार फोन आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भालचंद्र नेमाडे यांच्या पत्नी प्रतिभा नेमाडे यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, हिंदू कादंबरीतील उल्लेखामुळे नेमाडे यांच्या पत्नीला धमकीचा फोन आला आहे.

प्रतिभा नेमाडे यांना एका अज्ञात व्यक्तिचा फोन आला होता. भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीमध्ये वंजारी समाजातील महिला विषयी लिखाणाबद्दल या अज्ञात व्यक्तिने आक्षेप घेतला आहे. हे बदनामीकारक लिखाण आहे. त्यामुळे तुमच्या घरात घुसून मारहाण करण्याची धमकी या अज्ञात व्यक्तिने दिली आहे. म्हणून प्रतिभा नेमाडे यांनी याबाबत वाकोला पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली आहे.  (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

- Advertisement -

हेही वाचा – कार चालवण्याच्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर लगावला टोला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -