Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; जोडप्याने अल्पवयीन मुलीला लोटले वेश्या व्यवसायात

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; जोडप्याने अल्पवयीन मुलीला लोटले वेश्या व्यवसायात

Subscribe

नाशिक : एका दांम्पत्याने १६ वर्षीय मुलीस वेश्या व्यवसायास लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका ग्राहकास पाठवून मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशबू सुराणा आणि परेश सुराणा व अन्य एक ग्राहक असे संशयितांची नावे आहे.

सातपूर परिसरातील अकारावीचे शिक्षण घेणार्‍या मुलीने सरकारवाडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पिडीतेच्या कुटूंबियांची आर्थिक परिस्थिती हलाखीच्या असल्याने ती उन्हाळी सुट्टीनिमित्त १ मार्च २०२३ रोजी नोकरीच्या शोधार्थ घराबाहेर पडली होती. शरणपूर रोडवरील टिळवाडी सिग्नल परिसरातील एका बिल्डींगवर तिला योगा वेलनेस स्पा येथे कामास मुली पाहिजे असा बोर्ड बघून ती नोकरीची विचारणा करण्यासाठी गेली असता गेली. काऊंटरवर बसलेल्या महिला आणि पुरूषाने कौटूंबिक परिस्थिती जाणून घेत पिडीतेस तीन हजार रूपये पगार देण्याचे मान्य करीत तिला साफसाफाई चे काम करण्यासाठी कामावर ठेवले.

- Advertisement -

मुलीने महिलेचे नाव विचारले असता तिने खुशबू सुराणा सांगितले. दुसर्‍या दिवशी मुलगी कामावर गेली असता संबंधित महिला व पुरूषाने तिला खुर्चीवर बसवित ज्युस पाजले. त्या ज्युसमध्ये गुंगीचे औषध टाकण्यात आल्याचा आरोप तिने केला असून शुध्दीवर आल्यानंतर ती दुसर्‍या रूममध्ये अनोळखी व्यक्तीबरोबर होती. या ठिकाणी महिला दोघांचे अश्लिल चित्रीकरण करीत होती. संशयितांनी चित्रीकरण दाखवत या घटनेची वाच्यता केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने मुलगी भेदरलेल्या अवस्थेत रडत असताना अन्य एका ग्राहकानेही येवून तिच्यावर बलात्कार केला. तिने घरी येत आईकडे आपबिती सांगितली. पुढील तपास पोलीस निरीक्षक बंडेवाड करीत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -