घरमहाराष्ट्रधमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत; गृहमंत्री फडणवीसांकडून पोलिसांना कारवाईचे निर्देश

धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत; गृहमंत्री फडणवीसांकडून पोलिसांना कारवाईचे निर्देश

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  “लवकरच तुमचाही दाभोळकर होणार’ अशा आशयाची धमकी पवारांना देण्यात आली आहे. शरद पवारांपाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांचे लहान भाऊ सुनील राऊत यांनाही धमकी मिळाली. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आता या दोन्ही प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकीय नेत्यांना दिलेल्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणाला उच्च परंपरा आहे. राजकीय नेत्यांमध्ये मतभेद असले तरी मनभेद नाहीत. त्यामुळे कोणत्याही नेत्यांना धमक्या देणे, समाजमाध्यमांवर व्यक्त होताना मर्यादा ओलांडणे हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. या प्रकरणात कायद्याप्रमाणे निश्चित कारवाई होईल. या प्रकरणावर पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Threats will not be tolerated; Home Minister Fadnavis directed the police to take action)

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, सुप्रिया सुळेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

महाराष्ट्र सरकारने तक्रारीची दखल घेत कडक कारवाई करावी
शरद पवार यांनी धमकी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शरद पवारांना मिळालेल्या धमकीचा सखोल तपास केला पाहिजे. महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे. मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. भविष्यात काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार देशाचे आणि राज्याच्या गृहमंत्री जबाबदार आहे, असेही सुप्रिया सुळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर तक्रारीची दखल घेत करत कडक कारवाई करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यापोठापाठ संजय राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी

पवारांना धमकी देणाऱ्याला तत्काळ अटक करावी
शरद पवार यांना धमकी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून कारवाई करण्याची मागणी होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धमकी देणाऱ्याला तत्काळ अटक करून तुरुंगात टाकले पाहिजे. शरद पवारांसारख्या वरिष्ठ नेत्याला धमकी देणे योग्य नाही. राज्य सरकारकडून योग्य कारवाई करण्यात यावी. धमकी देणारा व्यक्ती कुठल्याही पक्षाचा असला तरी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे अशी धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी
दरम्यान, शरद पवार यांना ‘राजकारण महाराष्ट्राचे’ या ट्विटर हँडलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हे ट्विटर हँडल कोण चालवतं याची अद्याप माहीत स्पष्ट होऊ शकलेली नाही. मात्र या प्रकरणाचं गांभीर्य पाहून लगेचच मोठा पोलीस बंदोबस्त शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक घराबाहेर आणि पुण्यातील घराबाहेर तैनात करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -