घरमहाराष्ट्रसिंधुदुर्गात व्हेल माशाच्या उल्टीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, साडे पाच कोटींचा मुद्देमाल...

सिंधुदुर्गात व्हेल माशाच्या उल्टीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, साडे पाच कोटींचा मुद्देमाल जप्त

Subscribe

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची मोठी कारवाई

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यावधी रुपये किंमत असलेली मागणी असलेली व्हेल माशाची उल्टी बांदा बाजारपेठेत स्थानिक गुन्हा अन्वेषण सिंधुदुर्गच्या पथकाने सापळा रचून पकडली. यामध्ये तब्बल ५ कोटी ३२ लाख २० हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह गोव्यातील तीन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. संशयितांच्या ताब्यातील स्विफ्ट कारही जप्त करण्यात आली आहे. संशयीत काँन्टनटिनो फीलोमीनो फर्नाडिस (सालशेत मडगाव), जुजू जोस फेरीस (सालशेत मडगाव) व तनिष उदय राऊत (१८, तोरसे, लंगरबाग) अशी त्यांची नावे आहेत. गुप्त माहीतीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने बांद्यात सापळा रचून ही धाडसी कारवाई केली.

संरक्षित प्राणी, व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) या बेकायदेशीर व्यापार करणाऱ्या इसमांचा सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला. व्हेल माशाची उलटी म्हणजे समुद्रातील तरंगते सोने असे मानले जाते. सदरचा पदार्थ हा स्पर्म व्हेल माशाच्या पोटात तयार होतो. नमुद पदार्थाचा वापर हा अति उच्च प्रतिचा परफ्युम, औषधांमध्ये तर काही ठिकाणी सिगारेट, मद्य तसेच खाद्य पदार्थांमध्ये स्वाद वाढविण्यासाठी देखील केला जातो. सदर पदार्थाची खरेदी विक्री करणे हे वन्य प्राणी सुरक्षा अधिनियमांतर्गत बेकायदेशीर आहे. नमुद पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये करोडो रुपयांमध्ये किंमत आहे.

- Advertisement -

वन्य संरक्षित प्राणी व्हेल माशाची उलटी बेकायदेशीररित्या विकण्याकरीता बांदा परिसरात येणार असल्याची माहीती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार बांदा गांधी चौक येथे सापळा रचण्यात आला होता. गोव्यातील तीन संशयितांकडून व्हेल मासा लाळसह स्विफ्ट कार (जीए ०८ एम ५०५५) व मोटर सायकल (जीए ०३-०५४९) ताब्यात घेतली. सदर संशयित एका पिशवीमधून ५ किलो २३२ ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी ज्याची किंमत साधारणतः ५ कोटी ३२ लाख २० हजार रुपये इतकी आहे.

सदर कारवाईनुसार तिन्ही संशयित आरोपीना ताब्यात घेत वन्य प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राजेद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, हेड काँस्टेबल अनिल धुरी, आशिष गंगावणे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रवीण वालावलकर, पोलीस नाईक चंद्रकांत पालकर, पोलीस काँस्टेबल ज्ञानेश्वर कांदळगांवकर, प्रथमेश गावडे यांनी केली. वनविभागाचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर, वनरक्षक डी. बी. शिंदे, वनपाल अनिल मेस्त्री, प्रमोद राणे, शशिकांत देसाई, प्रविण पाटील उपस्थित होते. या कारवाईने सिंधुदुर्गसह गोव्यातही खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

 

सिंधुदुर्गात व्हेल माशाच्या उल्टीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, साडे पाच कोटींचा मुद्देमाल जप्त
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -