घरमहाराष्ट्रविहिरीवर पोहायला गेलेल्या मुलांची नग्न धिंड

विहिरीवर पोहायला गेलेल्या मुलांची नग्न धिंड

Subscribe

विहिरीत पोहले म्हणून मातंग समाजातील तीन तरुणांची मारहाण करीत नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली. कहर म्हणजे नग्न धिंडीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले गेले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी येथे ही संतापजनक घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून दोघांना अटक केले आहे. या घटनेबाबत मातंग समाजाकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

कसा घडला हा प्रकार
समाजसुधारकांचा वारसा आणि संविधानाचा आरसा या घटनेमुळे पुन्हा एकदा शरमिंदा झाला. रविवार, १० जून रोजी सचिन चांदणे व राहुल चांदणे हे दोघे चुलत भाऊ आणि त्यांचा मित्र वाकडी गावातील कर्णफाट्यानजीक असलेल्या ईश्वर जोशी यांच्या मालकिच्या विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. मुलांना आपल्या विहिरीत बघून जोशीने शिवीगाळ करुन पट्ट्याने मारहाण केली. येवढे करुन जोशीचा राग शांत नाही झाला म्हणून शेतात त्यांची नग्न धिंड काढली. जातिभेद, अस्पृश्यता यातून समाजात उभ्या राहिलेल्या भिंती आणि माणसांमधील उच्च-नीचतेच्या भावनेमुळे विशिष्ट जातींचे होणारे शोषण यातून शोषितांना सहन कराव्या लागणाऱ्या गुलामगिरीचे आणि पाशवी अत्याचाराचे चित्र या घटनेमुळे पुन्हा एकदा बोलके झाले.

- Advertisement -

पीडितांच्या घरामध्ये भितीचे वातावरण
ही घटना सोशल मीडियावर व्हारल झाल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मात्र ही घटना १० जून रोजी घडली होती. खालच्या जातीचे असल्याने गावातून काढण्याच्या भितीने पीडित मुलांच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली नव्हती. मात्र सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर पीडित कुटुंबियाकडून तक्रार करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -