घरताज्या घडामोडीपुण्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती! एकाच बेडवर ३ रुग्णांवर उपचार सुरु

पुण्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती! एकाच बेडवर ३ रुग्णांवर उपचार सुरु

Subscribe

पुण्याच्या ससून रुग्णालयात एकाच बेडवर तीन जणांवर केले जात आहेत उपचार.

राज्यासह पुण्यात देखील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पुण्याची सध्याची परिस्थिती फार गंभीर आहे. पुण्यात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर देखील त्याचा परिणाम होत आहे. यामध्ये अनेक रुग्णांची हेळसांड होत असून पुणे शहरात एका बेडवर अक्षरश: तीन-तीन रुग्णांना ठेवले जात आहे. तर काही रुग्णांना जमिनीवर ठेऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यातच एखादा नवा रुग्ण आला तर उपचार सुरु असलेल्या एखाद्या रुग्णाला इतर रुग्णालयात हलवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ही गंभीर परिस्थिती सध्या पुण्याच्या ससून रुग्णालयातील आहे. तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुण्यातील खाजगी आणि शासकीय आरोग्य यंत्रणा मेटाकुटीला आल्या आहेत.

पुण्याच्या ससून रुग्णालयात दररोज कोरोनाबाधित रुग्ण दाखल होत आहेत. या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ४० रुग्ण एवढी क्षमता आहे. मात्र, दररोज ६० रुग्ण या वॉर्डमध्ये येत आहेत. त्यामुळे याचा वाढीव ताण आता डॉक्टरांसह नर्सेस आणि इतर आरोग्य यंत्रणेवर येत आहे. त्यामुळे आता पुणेकरांची चिंता वाढली आहे.

- Advertisement -

अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका

पुण्याच्या ससून रुग्णालयात अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे याचा संपूर्ण फटका आरोग्य यंत्रणेवर येत आहे. एकीकडे रुग्णांच्या आकडेवारीत दिवसागणिक वाढ होत आहे. तर दुसरीकडे डॉक्टर आणि नर्स यांचे अपुरे संख्याबळ यामुळे आता उपचार कसे करावे?, असे एक ना अनेक प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडले आहेत. मात्र, तरी देखील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कंबर कसून लढत आहे.


हेही वाचा – नाशिक जिल्ह्यातील २६ हजार मजूर सरकारी मदतीपासून वंचित

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -