घरमहाराष्ट्रराज्यात तीन दिवस पावसाचे? मुंबईसह या भागांत बरसण्याची शक्यता; वाचा हवामानाचा अंदाज

राज्यात तीन दिवस पावसाचे? मुंबईसह या भागांत बरसण्याची शक्यता; वाचा हवामानाचा अंदाज

Subscribe

राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 3-4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.

मुंबई: राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 3-4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. याशिवाय मुंबईतही 25 आणि 26 नोव्हेंबरला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह इतर भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. (Three days of rain in the state Chance of rain in these areas including Mumbai Read the weather forecast)

विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

याशिवाय मुंबईत एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह ( ताशी 30 ते 40 किमी) पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पावसानंतर शहरातील हवेच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. शक्यता आहे. सिस्टीम ऑफ एअऱ क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्सच्या आकडेवारीनुसार, पुर्वेकडील वारे पश्चिमेकडे सरकत आहेत. ज्यामुळे तामिळनाडू किनारपट्टीवर पाऊस पडत आहे. तो लवकरच केरळ आणि आसपासच्या भागात पोहोचेल.

- Advertisement -

मुंबईत पावसाची शक्यता

दरम्यान, 25 ते 26 नोव्हेंबर मुंबईत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज 24 नोव्हेंबरलाही ढगाळ वातावरण राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण शहरात चांगला पाऊस होऊ शकतो. 27 नोव्हेंबरला पाऊस कमी होऊ शकतो. बुधवारी मुंबईचा हवेचा दर्जा निर्देशांक 122 होती, जो मध्यम श्रेणीचा आहे. यापूर्वी 9 नोव्हेंबरला मुलुंड, मालाड आणि गोरेगाव कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला होता.

- Advertisement -

या जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, बीड, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

(हेही वाचा: हिंदुहृदयसम्राट म्हणून एकनाथ शिंदेंनी काय महान केलं हे पाहावं लागेल; राजस्थानमधील ‘त्या’ बॅनरवर राऊतांचा संताप)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -